दिवंगत सुशांत सिंग राजपूतच्या ‘छिछोरे’ला मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
मुंबई | 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराच्या घोषणेला ‘नॅशनल मीडिया सेंटर’मध्ये नुकतीच सुरूवात झाली आहे. यावर्षीचा सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा पुरस्कार दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा शेवटचा सिनेमागृहात रिलीज झालेला चित्रपट ‘छिछोरे’ला मिळाला आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता.
‘नॉन फिचर फिल्म’ विभागात हिंदी भाषेतील सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार ‘एन इंजीनियर्ड ड्रीम’ला मिळाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन हेमंत गाबाने यांनी केले आहे. स्पेशल मेंशन पुरस्कारात चार चित्रपट बिरियानी, जोना की पोरबा (आसमिया), लता भगवान करे (मराठी) आणि पिकासो (मराठी) यांचा समावेश आहे.
यावर्षीच्या राष्ट्रीय पुरस्कारांसाठी फिचर फिल्म विभागासाठी एकूण 461 चित्रपटांचा समावेश होता. 2019 मधील मोस्ट ‘फिल्म फ्रेंडली स्टेट’ विभागात तेरा राज्यांनी सहभाग घेतला होता. त्यातून हा पुरस्कार सिक्किमला जाहीर करण्यात आला आहे.
दरम्यान, 2020 हे वर्ष कोरोना व्हायरसच्या महारोगराईच्या संकटात गेले आणि त्यामुळे 2019 साली बनलेल्या चित्रपटांचे पुरस्कार आज जाहीर करण्यात येणार आहे. कोरोनामुळे मागील वर्षी राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली नव्हती. जो पुरस्कार सोहळा 3 मे 2020 रोजी पार पडणार होता. तो पुरस्कार सोहळा आज पार पडलेला आहे. त्यामुळे यंदा 2019 सालातील पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
View this post on Instagram
View this post on Instagram
थोडक्यात बातम्या –
काही होणार नाही; प्रकरण वाझे साहेबांकडेच आहे; मनसुख हिरेन यांचं भावासोबतचं संभाषण ‘एनआयए’कडे
चुकीला माफी नाही! राष्ट्रवादीच्या ‘त्या’ नेत्यांवर अखेर गुन्हा दाखल
अवघ्या 23 वर्षांची अंकिता झाली ‘या’ गावची सरपंच; गावाबद्दल असलेलं स्वप्न ऐकूण तुम्हीही व्हाल थक्क
परमबीर केंद्र सरकारचा बोलका पोपट; अंडरवर्ल्डशी लिंक असलेल्यांशी घरोब्याचे संबंध- विनायक राऊत
शरद पवारांकडून गृहमंत्र्यांना क्लीनचीट, मात्र काँग्रेस म्हणते मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा!
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.