मुंबई | दिल्लीत सुरु असलेल्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सरु आहे. या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी आज शेतकरी मोर्चा राजभवनात धडकला आहेत. यावर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी वक्तव्य केलं आहे.
किसान सभेने मुंबईत आंदोलन करण्याची गरज नाही. हे आंदोलन प्रसिद्धीसाठी आहे. कायदा सरकारने केला आहे, मागे घेण्याचा प्रश्न नाही. शेतकऱ्यांनी आंदोलन थांबवायला हवं, असं आठवलेंनी म्हटलं आहे.
तसंच, आज राजभवनावर होणाऱ्या शेतकऱ्यांच्या मोर्चाला आम्ही परवानगी दिली नसल्याचं मुंबईचे सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक व माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सांगली-कोल्हापुरात ट्रॅक्टर आंदोलन केलं जाणार आहे.
थोडक्यात बातम्या-
“केंद्र सरकारने तयार केलेले कृषी कायदे रद्द होणार नाहीत”
मोदींनी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले, आंदोलनात राजकारण येऊ नये- पंकजा मुंडे
“राज्य सरकारातला एक मंत्री जिरवायची भाषा करतो हे योग्य नाही”
पॉर्न पाहात असला तर सावधान; पुढचे काही दिवस सतर्क राहा, नाहीतर…
निर्वस्त्र न करता छातीला स्पर्श करणे लैंगिक अत्याचार नव्हे; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
Comments are closed.