बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मोठ्याचा मुलगा असो किंवा कोणत्या नेत्याचा सर्वासाठी कायदा हा समानच आहे”

मुंबई | मुंबई-गोवा-मुंबई क्रुझवर मोठी धाड टाकत एनसीबीनं बऱ्याच जणांना ताब्यात घेतलं. यामध्ये सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचाही सहभाग होता. या ड्रग्स प्रकरणी आर्यनलाही अटक करण्यात आली असून आज त्यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे. याप्रकरणामुळे राजकीय वातारणही तापलं आहे. आता यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

‘मोठ्याचा मुलगा असो किंवा कोणत्या नेत्याचा सर्वासाठी कायदा हा समानच आहे’, असं अजित पवारांनी म्हटलं आहे. आर्यनच्या अटकेनंतर अनेकजण समोर येत सरकावर ताशेरे ओढत असल्याचं पहायला मिळतय. याशिवाय काहींनी तर शाहरुख खानमुळे या प्रकणाला पाठिंबाही दिला आहे.

एनसीबीनं समीर वानखेडेंच्या मार्गदर्शनाखाली ही धाड टाकली. आतापर्यंत टाकलेल्या धाडींपैकी ही सगळ्यात मोठी धाड आहे. यामध्ये 12 जणांना अटक कऱण्यात आलीय. या प्रकरणात एनसीबी अजून तपास करत आहे. तपासात आणखी काय समोर येणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, आर्यनकडून 13 ग्रॅम कोकेन, 5 ग्रॅम एमडी, 21 ग्रॅम चरस, एमडीएमएच्या 22 पील्स व रोख 1.33 लाख रुपये हस्तगत करण्यात आलं आहेत. त्यामुळे त्याच्यावर बरेच आरोप करत अटक करण्यात आली आहे. आज आर्यनच्या जामिनासाठी सुनावणी होण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या – 

पगार थकवला म्हणुन मालकाच्या गाडीला लावली आग; चिंचवडमधील धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यात कैद

“हा मोदींचा नवीन भारत आहे, इथे गुन्हेगारांना दंड दिला जातो मग तुमचा बाप कोणीही असो”

आर्यन खानने ‘या’ ठिकाणी लपवले होते ड्रग्ज; धक्कादायक माहिती समोर

‘या’ कारणामुळे प्रियंका गांधी पोलिसांच्या ताब्यात, काय आहे प्रकरण?

शाहरुखला सपोर्ट करण्यासाठी सलमान धावला, रात्री उशिरा मन्नतवर पोहोचला

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More