भाजपला फटका ‘या’ नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

नांदेड | तीस वर्ष शिवसेनेत असलेले आणि साडेचार वर्ष भाजपमध्ये राहिलेले माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी रविवारी (काल) काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

वानखेडे हे शिवसेनेत असताना हदगाव तालुक्यातील ल्याहरीचे सरपंच होते. त्यानंतर हदगाव विधानसभेचे शिवसेनेचे आमदार होते. 2009 मध्ये शिवसेनेचे हिंगोलीचे खासदारदेखील होते.

2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत वानखेडे यांचा पराभव झाल्यानंतर भाजपमध्ये साडेचार वर्ष राहिलेले वानखेडे यांनी रविवारी (काल) काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयात माजी खासदार सुभाष वानखेडे यांचे काँग्रेस पक्षात प्रवेश देऊन स्वागत केले. 

महत्वाच्या बातम्या-

-तलवारीने चेहऱ्यावर सपासप वार करुन धनंजय मुंडेंच्या समर्थकाची हत्या

-चौकीदारानेच देश खाल्ला; शरद पवारांचा मोदींवर घणाघात 

-देवेंद्रजी मला तुमचा अभिमान वाटतो, तुम्ही दिलेला शब्द पार पाडला- उद्धव ठाकरे

-चेहऱ्यावर तलवारीने वार करुन राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाची निर्घृण हत्या

-बीफ बिर्यानी खाऊन झोपला होतात का? पुलवामा हल्ल्यावरुन ओवेसींचा मोदींना सवाल