माहीवर या दिग्गज क्रिकेटपटूनेही केला हल्लाबोल

नवी दिल्ली | भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकर नंतर मोहिंदर अमरनाथ यांनीही भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. धोनी आणि इतर क्रिकेटपटूंनी देशांतर्गत क्रिकेट खेळण्याची गरज आहे, असं ते म्हणाले.

धोनीला आॅस्ट्रेलिया आणि विंडीज विरुद्ध झालेल्या टी-20 मालिकेत चांगली कामगिरी न करता आल्यामुळे त्याला संघातून वगळण्यात आले होते.

“जर तुम्हाला भारतीय संघात खेळायचे असेल तर तुम्ही आधी आपल्या राज्याकडून खेळा. संघात निवड होण्यासाठी खेळाडूला त्याचा फॉर्म कायम ठेवणे गरजेचे असते” अस वक्तव्य अमरनाथ यांनी केलं.

दरम्यान, धोनीप्रमाणेच शिखर धवनही सध्या चालू असलेल्या भारतीय कसोटी संघात नाही. धवन सध्या सुरु असलेल्या रणजीमध्ये सुद्धा खेळत नाही. 

महत्वाच्या बातम्या 

-तीन राज्यातील पराभवाचा भाजपनं घेतला धसका; बोलावली बैठक

“इतर राज्यांतील निकालांचा महाराष्ट्रात परिणाम होणार नाही”

-डिलिव्हरी बाॅयच्या व्हायरल व्हीडिओनंतर झोमॅटोचा ‘हा’ महत्वपूर्ण निर्णय

-राम मंदिरासाठी शिवसेना आक्रमक; लोकसभेत मांडला मुद्दा

-प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याप्रकरणी देवेंद्र फडणवीसांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस