बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सिंहाने बिबट्यावर केला हल्ला अन् ‘या’ प्राण्याला बघताच सिंह गेला पळून, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | आपल्या सगळ्यांनाच माहित आहे जंगलाचा राजा हा सिंह आहे. सिंहाची चाहूल लागली तरी दुसरे प्राणी आपली वाट बदलतात. परंतू, तुम्हाला माहित आहे का सिंह कोणत्या प्राण्याला घाबरतो? नसेल तर माहीत, तर आता सध्या सोशल मीडियावर याच संबंधीत एक व्हिडीओ खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये सिंहाने एका बिबट्याची शिकार केली आहे. सुरूवातीला एक बिबट्या एका खडकावर निवांत झोपलेला असल्याचं दिसून येत आहे. एक सिंह बिबट्याला झोपलेल्या अवस्थेच पाहतो आणि तो त्या ठिकाणी येतो. बिबट्याच्या जवळ आल्यानंतर तो बिबट्या खरंच झोपला आहे की नाही, याची शहानिशा करतो. नीट पाहिल्यानंतर बिबट्या झोपलेलाच असल्याचं समजल्यानंतर सिंह त्या बिबट्यावर हल्ला करतो.

बिबट्या बेसावध असल्यामुळे त्याला काय घडलं हे काही क्षण कळतच नाही. त्यानंतर बिबट्या आपला जीव वाचवण्यासाठी पळतो. परंतू, सिंह शिकार करण्यात तरबेज असल्यामुळे सिंह त्याचा पाठलाग करू लागतो. काही केल्या सिंह त्या बिबट्याचा पाठलाग करायचं सोडत नाही.

त्याच वेळेस नेमका एक हत्ती पुढून येत होता. पुढून येत असलेल्या हत्तीला पाहिल्यानंतर सिंहाने तिथून धूम ठोकली. तसेच या व्हिडीओमध्ये सिंहाचं हत्तीला पाहून पळून जाणं पाहिल्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या-

गुजरातला 1 हजार कोटी दिले, महाराष्ट्राला तुम्हाला योग्य वाटेल तेवढे तरी द्या- अजित पवार

कोरोनामुक्त झालेल्या माय-लेकीचा पाठलाग करत आईवर गँगरेप, मुलगी वाचली

राज्य सरकारनं उचललं मोठं पाऊल; पुण्यात ‘एवढ्या’ टन ऑक्सीजनची निर्मिती होणार

मोठी बातमी! मराठा समाजाला मिळणार आरक्षणाचा लाभ; राज्य सरकारची मोठी घोषणा

भांडत भांडत बालकनीपर्यंत आले नवरा-बायको अन्…; थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More