बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तिने भररस्त्यात स्वत:चे कपडे फाडून घेत दिली धमकी, चिडलेल्या प्रियकराने उचललं टोकाचं पाऊल

मुंबई | मुंबईतील वांद्रा येथे एक संतापजनक घटना घडली आहे. या घटनेमध्ये प्रेयसीने रस्त्यात कपडे फाडून प्रियकराला धमकी दिली. यामुळे चिडलेल्या प्रियकराने जागीच आपल्या प्रेयसीचा जीव घेतला. या घटनेनंतर संपुर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

संबंधित प्रियकराचं नाव बिपीन कंडुलना असं असून त्याच्या प्रेयसीचं नाव इशिता कुंजुर असं आहे. बिपीन आणि इशिता यांची एक वर्षापुर्वी फेसबुकवर ओळख झाली होती. बिपीन हा वांद्रे परिसरातील एका हाॅटेलमध्ये कामाला होता. तर इशिता ही घरकाम करत होती. रविवारी रात्री पीडित मुलगी आरोपीच्या लाल मिठी परिसरातील घरी आली होती.

रविवारी आरोपीच्या घरी बिपीन आणि इशिता दोघांनी शरीर संबंध देखील ठेवले. यानंतर मुलगी आरोपीकडे दीड लाख रुपयांची मागणी करू लागली. पैसे न दिल्यास खोट्या बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊ लागली. त्यानंतर आरोपीने तिची समजूत काढून वांद्रे रिक्लेमेशन परिसरात फिरण्यासाठी नेलं. मात्र तेथे सुद्धा प्रेयसीने त्याच्याकडे पैश्यांची मागणी केली.

दरम्यान, आरोपीने वारंवार समजावण्याचा प्रयत्न करून देखील मृत मुलीने स्वत:चे कपडे फाडून घेत. आरडा ओरडा करण्यास सुरुवात केल्यानंतर आरोपीने तिचा गळा आवळून हत्या केली. याबाबतची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी बिपीनला बेड्या ठोकल्या. आरोपी आणि मृत तरुणी हे दोघेही मुळचे झारखंडचे रहिवाशी असल्याची माहिती तपासात समोर आली असून गुन्हे शाखेचे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

थोडक्यात बातम्या-

देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर शरद पवारांनी बोलवली राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्याची बैठक!

‘बॅटिंगवर लक्ष दे, ट्विटरवर नको’ म्हणणाऱ्या नेटकऱ्याला धोनीचं उत्तर; माहीचं 9 वर्षांपूर्वीचं ट्विट व्हायरल

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेता करण मेहराला अटक

सकारात्मक बातमी: वय 92, HRCT स्कोअर 12, त्यात मूत्रपिंडाला सूज; तरीही कोरोनावर मात!

“…तर आज देशात एवढ्या जणांचा मृत्यू झाला नसता”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More