बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“वकिलाला दररोज अडीच लाख रुपये; राज्य सरकार कोणाचे हित जपत आहे?”

मुंबई | महाविकास आघाडीच्या सरकारमधील कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या सांगण्यावरून आपणास मारहाण झाल्याचा आरोप अनंत करमुसे या तरूणानं केला होता. अनंतने वर्षभरापुर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. आव्हाडांना त्या पोस्टचा राग आल्यानं त्यांनी कार्यकर्त्यांना सांगून त्यांच्या ठाण्याच्या बंगल्यावर मारहाण केल्याचा आरोप या तरूणानं केला आहे. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी चालू आहे. आता या प्रकरणातील वकिलाच्या फी मुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे.

सामान्य मााणसाला मारहाण करणाऱ्या कॅबिनेट मंत्र्याला वाचविण्यासाठी महाविकास आघाडी सरकार उच्च न्यायालयात प्रतिदिन सुनावणीसाठी वकिलाला दररोज अडीच लाख रुपये देणार आहे. तर कोविड आपत्तीत सेवा पुरविणाऱ्या व्यावसायिकांना पैसे दिले जात नाहीत. अशा परिस्थितीत राज्य सरकार कोणाचे हित जपत आहे?, असा सवाल भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी उपस्थित केला आहे.

अनंत करमुसे मारहाण प्रकरणात राज्य सरकारने अॅड. अनिल साखरे यांची सरकारी अभियोक्ता म्हणून नियुक्ती केली आहे. या प्रकरणात होणाऱ्या सुनावणीचे दर अडीच लाख रूपये प्रतिदिन देण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. निरंजन डावखरे यांनी शासन निर्णयाची प्रत ट्विट केली आहे.

दरम्यान, या प्रकरणात आरोपीविरूद्ध आरोपपत्र दाखल केलं गेलं असल्यानं डेटा रेकॉर्ड जतन करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता ठाकरे सरकारबरोबरच जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणीत देखील वाढ होणार आहे.

पाहा ट्विट-

थोडक्यात बातम्या-

‘या’ रक्तगटातील लोकांना कोरोनाचा धोका अधिक; CSIR च्या संशोधनातून खुलासा

”शिवसेना भवनातून करिना-कतरिनाला फोन केले जातात, पैसे देऊन ट्विट करायला सांगतात”

पत्नीने केली आत्महत्या, माहिती मिळताच पतीने देखील घेतला गळफास

महाराष्ट्रात लाॅकडाऊनमध्ये 1 जूनपर्यत वाढ ‘ही’ आहे नवी नियमावली 

“डोळ्यावरील गुलाबी चश्मा उतरवावा, मोदींना ‘सेंट्रल विस्टा’ शिवाय काहीच दिसत नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More