बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“महाविकास आघाडी सरकार हे शिवशाही सरकार नसून बेबंदशाही सरकार”

मुंबई | मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रित करून आता भाजप नेते आक्रमक होताना दिसत आहेत. आशिष शेलार, सुधीर मुंगटीवार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडण्यास सुरवात केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसीच्या राजकीय आरक्षणावरून ठाकरे सरकारला थेट इशारा दिला होता. त्यानंतर आता भाजपचे नेते आशिष शेलार ठाकरे सरकारवर कडाडून टीका केली आहे.

मराठा आरक्षण, ओबीसी राजकीय आरक्षणबाबतही महाविकास आघाडी सरकार काहीच करू शकले नाही. अधिवेशन काळात आपल्याला काहीतरी करता येते, मात्र हे अधिवेशन फक्त दोन दिवसासाठी घेण्याचा निर्णय या सरकारनं घेतल्यामुळं हे सरकार राज्यात अपयशी ठरलं आहे, असं शेलार म्हणाले.

राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे आता शिवशाही सरकार राहिले नसून बेबंदशाही सरकार झालेले आहे, असा आरोप भाजपचे नेते आशिष शेलार यांनी केला आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र संतापजनक व चिंताजनक वातावरण दिसले. त्याला पालकमंत्री जबाबदार असल्याचेही आशिष शेलार म्हणाले. ते सध्या सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर आहेत.

दरम्यान, तौक्ते चक्रीवादळामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अतिशय धावता पाहणी दौरा करून लाभार्थ्यांना त्यांनी मदतीचा जाहीर केलेला 252 कोटीचा आकडा मात्र लाभार्थ्यांची बोळवण करणारा ठरला आहे, अशी टीका देखील त्यांनी केली आहे.

थोडक्यात बातम्या-

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून 24 तासांत जितेंद्र आव्हाडांची नाराजी दूर; काढला हा तोडगा

उंदराने डोळे कुरतडलेल्या 24 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू!

“विरोधी पक्ष नक्की कोठे आहे?, पवारांनी फक्त आस्वाद घेण्याचं काम केलं”

कोरोनावर तयार होणार ‘सुपरव्हॅक्सिन’; सर्व व्हेरिंएटचा नायनाट करणार

जमशेदजी टाटा ठरले जगातील सर्वाधिक दानशूर व्यक्ती; गेल्या 100 वर्षांत केलं सर्वाधिक दान

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More