नवी दिल्ली | देशाचे माजी संरक्षण मंत्री आणि ज्येष्ठ कामगार नेते ‘जाॅर्ज फर्नांडीस’ यांचं वयाच्या 88व्या वर्षी निधन झालं. राजधानी दिल्ली मध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
कामगारांच्या प्रश्नांसाठी त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची घातलं. कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी ते आयुष्यभर झटत राहिले.
भारतीय रेल्वेच्या इतिहासातील पहिला संप फर्नांडीस यांनी 1974 साली केला होता. अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या भाजप आघाडी सरकारमध्ये संरक्षणमंत्री म्हणून उत्तमरित्या त्यांनी काम पाहिलं.
दरम्यान, मुंबई पहिल्यांदा बंद पाडणारा झुंजार नेता म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या जाण्याने सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
महत्वाच्या बातम्या-
-जे आमच्यासोबत येतील त्यांच्यासोबत, नाही तर त्यांच्याशिवाय- मुख्यमंत्री
-गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
-नितीन गडकरी यांनी ते वक्तव्य मोदींना उद्देशूनच केलं- काँग्रेस
-उपाशीपोटी पुण्याच्या रस्त्यावर बसलेल्या शेतकऱ्यांना जेवण आणा!
-…म्हणून भर थंडीतही शेतकरी पुण्याच्या रस्त्यावर मुक्काम ठोकणार