बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे त्यांना विरोध नाही, पण आम्ही काय भिकारी आहोत का?”

मुंबई | मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, आणि पदोन्नतीतील आरक्षण या तीनही विषयावरून ठाकरे सरकार चांगलंच अडचणीत आलं आहे. तर पदोन्नतीतील आरक्षणावरून ठाकरे सरकारला खुद्द काँग्रेसच्या दबावाचा सामना करावा लागत आहे. तर दुसरीकडे भाजपने ओबीसी आरक्षणावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. यातच आता ठाकरे सरकारमधील मंत्र्यांनेच सरकारला आक्रमक इशारा दिला आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे त्यांना विरोध नाही. पण आम्ही अजूनही हातात बांगड्या घातलेल्या नाहीत. आम्ही काय भिकारी आहोत का?, असा सवाल उर्जामंत्री नितीन राऊत यांनी उपस्थित केला आहे. आम्ही जे संविधानात्मक आहे जे भारतीय राज्यघटनेने दिलं आहे, तेच आम्ही मागतो आहे, असं देखील त्यांनी म्हटलं आहे.

मराठा समाजानेसुद्धा मोठेपणा दाखवून आम्हाला वेठीस धरू नये. आमचं भांडवल करून तेच फक्त काम करु शकतात, आम्ही करु शकत नाही, अशी भूमिका घेऊ नये , असा इशारा नितीन राऊत यांनी दिला आहे. त्यामुळे मागासवर्गीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती आरक्षणावरून नितीन राऊत आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.

दरम्यान, काही दिवसांपुर्वी मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर मराठा समाजाचा रोष पाहता ठाकरे सरकारने पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या या निर्णयानंतर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली होती. त्यामुळे आता ठाकरे सरकारमध्येच वाद होताना दिसत आहेत. तर मराठा समाजापाठोपाठ आता ओबीसी समाजही राज्यव्यापी मोर्चा काढणार असल्याचं सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

पुण्यातील प्रसिद्ध महात्मा फुले मंडईच्या इमारतीमधील लाकडी भागाला आग

नवी मुंबईतील विमानतळाला ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे’ यांचं नाव – एकनाथ शिंदे

“आपल्या मुली पळून जाऊ द्यायच्या नसतील तर त्यांना फोनपासून दूर ठेवा”

‘…अन्यथा आणखी वाईट परिस्थिती ओढवेल’; सिब्बलांचा पक्षनेतृत्वाला इशारा

श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर; ‘या’ खेळाडूकडे कर्णधारपद

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More