बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“भारत पाकिस्तान सामना होणं हे राष्ट्रहिताच्या विरोधात”

मुंबई | भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये रविवारी पारंपारिक लढत होणार आहे. क्रिकेट चाहत्यांना या सामन्याची प्रतिक्षा लागली आहे, अशातच आता काही लोकांनी या भारत पाकिस्तान सामन्यावर बहिष्कार टाकावा, अशी मागणी केली आहे. त्यातच आता योगगुरू आणि पंतजलीचे संस्थापक योगगुरू बाबा रामदेव यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

पाकिस्तान दशदतवाद्यांना पोसतं. त्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले होत असतात. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील विश्वचषकातील सामना रद्द करावा, अशी मागणी केली जात आहे. यावर एका हिंदी वृत्तसंस्थेच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या योगगुरू बाबा रामदेव यांनी सामना होऊ नये, अशी मागणी केली आहे.

भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सामना राष्ट्रविरोधी आणि राष्ट्रधर्माच्या विरोधात असल्याचं मत बाबा रामदेव यांनी मांडलं आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह देखील  भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वादाच्या पार्श्वभूमीवर सामना रद्द करण्याचं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता बाबा रामदेव यांनी हे वक्तव्य केलंय.

दरम्यान, रविवारी संध्याकाळी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये पहिला टी-20 विश्वचषकातील पहिला सामना रंगणार आहे. त्यामुळं क्रिकेट चाहत्यांच्या भारताच्या विजयाच्या आशा गगणाना भिडल्या आहेत. त्यामुळे आता चाहत्यांची उत्सुकता देखील शिगेला पोहचल्याचं दिसतंय.

थोडक्यात बातम्या –

‘नवाब मलिक हे पाकिस्तानचे एजंट’; नितेश राणेंचा मलिकांवर हल्लाबोल

थायरॉइडमुळे त्रस्त आहात?; आहारात करा ‘या’ 6 गोष्टींचा समावेश

‘हिंमत असेल तर औरंगाबादचं नाव बदलून दाखवाच’; इम्तियाज जलील यांचं थेट आव्हान

ऑस्ट्रेलियाची विजयी सलामी! दक्षिण आफ्रिकेचा 5 गडी राखून पराभव

‘सितारों से आगे जहाँ और भी हैं’; नवाब मलिकांचा शायरीतूून टोला

घटस्फोटानंतर समंथाने केलं तिचं स्वप्न पुर्ण, फोटो शेअर करत म्हणाली…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More