बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

#IPL2021 दोन आक्रमक संघ भिडणार; ‘या’ खेळाडूंच्या कामगिरीवर विशेष लक्ष

नवी दिल्ली |  आयपीएल म्हणजे जगातील सर्वात प्रसिद्ध क्रिकेट स्पर्धा आहे. आयपीएल 2021 स्पर्धेचं आयोजन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर युएईमध्ये होत आहे. आयपीएल 2021च्या दुसऱ्या पर्वातील तिसरा सामना आज खेळवला जाणार आहे. आज पंजाब किंग्ज आणि राजस्थान राॅयल्स हे दोन संघ आज एकमेकांना भिडतील. त्यामुळे आता केएल राहूल आणि संजू सॅमसन यांच्या खेळीकडं सर्वांच लक्ष लागलं आहे.

विराट कोहलीच्या कर्णधारपदाच्या राजीनाम्यानंतर भारतीय कर्णधारपदाच्या शर्यतीत भारताचा सलामीवीर केएल राहूल सुद्धा आहे. परिणामी त्याच्या कामगिरीकडं देशातील क्रिकेट रसिकांच लक्ष आहे. पंजाब आणि राजस्थान दोन्ही संघाकडे आक्रमक फलंदाज आहेत. पंजाब किंग्ज संघाकडं केएल राहूल, ख्रिस गेल, मयंक अग्रवाल, अशी आक्रमक फलंदाजी आहे. राजस्थान संघाकडं संजू सॅमसन, एविन लूईस, लियाम लिव्हिंगस्टोन यांच्या सारखे नावाजलेेले फलदाज आहेत.

फलंदाजी ही पंजाब संघाची जमेची बाजू असली तरी गोलंदाजी कमकूवत ठरलेली आहे. पंजाबकडं मोहम्मद शमी यांच्यासारखा जागतिक किर्तीचा एकच गोलंदाज आहे. परिणामी पंजाबचा संघ मोहम्मद शमीवर जास्त अवलंबून आहे. याउलट राजस्थानच्या गोलंदाजीची धुरा ख्रिस माॅरीस, चेतन सकारिया, जयदेव उनादकट समर्थपणे सांभाळत आहेत. तर जागतिक टी-ट्वेंटी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावरील तबरेझ शम्सी राजस्थानकडं असल्यानं राजस्थानची गोलंदाजी मजबूत मानली जात आहे.

दरम्यान, पंजाब संघ आणि राजस्थान संघ अंतिम चार मध्ये प्रवेश करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजात केएल राहूल आघाडीवर आहे. तर त्याला ख्रिस गेल आणि मयंक अग्रवाल यांची साथ लाभली. त्यामुळे आजच्या सामन्यात पंजाब चांगली धावसंख्या उभारू शकतो. राजस्थान संघाच्या फलंदाजीची सगळी भिस्त संजू सॅमसन आणि लिव्हिंगस्टोन यांच्या खांद्यावर आहे. गुणतालिकेत राजस्थान 6 व्या तर पंजाब 7 व्या क्रमांकावर आहेत. त्यामुळे दोन्ही संघ आजचा सामना जिंकण्यासाठी प्रयत्नशिल असतील.

थोडक्यात बातम्या

पुढील 15 दिवस महत्त्वाचे! गणेशोत्सवानंतर ‘या’ शहरात तिसऱ्या लाटेची शक्यता

‘सोमय्यांच्या कारवाईशी मुख्यमंत्र्यांचा संबंध नाही’; दिलीप वळसे पाटलांचं स्पष्टीकरण

“सोमय्यांना पळून जावं लागलं, कोल्हापूरचा ‘पैलवान’ गडी कोणाला ऐकणार नाही”

भारताची ‘व्हॅक्सिन मैत्री’! आता इतर देशांनाही पुरवणार कोरोना लस

‘आम्ही चौकशी केली, त्यात कोणताही घोटाळा झालाच नाही’; देवेंद्र फडणवीसांनी आरोप फेटाळले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More