बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सरकार अधिवेशनापासून पळ काढतय, या पळपुट्या सरकारचा जाहीर निषेध”

मुंबई | आज राज्य सरकारने यावर्षीच पावसाळी आधिवेशन 14 दिवसांच न ठेवता, केवळ 5 आणि 6 जूलै या दोन दिवसच ठेवणार असल्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयावरून  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसेच भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधाला आहे. यांच्याच पाठोपाठ भाजपचे नेते प्रसाद लाड यांनीही राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.

या संदर्भात प्रसाद लाड यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे. राज्यातील सरकार कोरोनाचं कारण पुढे करून आधिवेशनापासून पळ काढत आहे, असं म्हणत प्रसाद यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

आरक्षण, ओबीसी आरक्षण शेतकऱ्यांचे प्रश्न, आशा वर्कर,परिचारिकांचे प्रश्न असे असंख्य प्रश्न, विद्यार्थ्यांचे प्रश्न समोर असताना 2 दिवसीय अधिवेशन घेऊन सरकार काय साध्य करणार?, असा सवाल करत. या पळपुट्या सरकारचा जाहीर निषेध करत असल्याचंही प्रसाद लाड यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, 14 दिवसाचं अधिवेशन झालं तर हायड्रोजन बॉम्बसारखा स्फोट झाला. ज्या सचिन वाझेची विना फी ची वकिली करत होते. तो सचिन वाझेच यांच्यावर उलटला. त्यामुळे त्यांना असं वाटतं की अधिवेशन जर 14 दिवसाचं झालं तर आपल्या तेरवीचा आणि गंगापूजनाचा कार्यक्रम होऊ शकतो,  असं वक्तव्य सरकारच्या अधिवेशनाच्या निर्णयावर मुनगंटीवार यांनी केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

‘या’ दिवसापासून सुरू होणार विधिमंडळाचं दोन दिवसांचं पावसाळी अधिवेशन

सर्वोच्च न्यायालयाकडून नवनीत राणांना दिलासा, जात प्रमाणपत्र रद्द प्रकरणी महत्वाचा निर्णय

लहान मुलांना कोरोनापासून वाचवण्यासाठी ‘ही’ जुनी लस ठरणार फायदेशीर?

“बारमध्ये गर्दी चालते, उद्घाटनाला गर्दी मग अधिवेशन का नको?, सरकार आहे की तमाशा”

“महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष सत्तेचा मलिदा खाण्यासाठी एकत्र आहेत”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More