Loading...

पुण्याच्या महापौर मुक्ता टिळकांना लागले ‘आमदार’ व्हायचे वेध???

पुणे : पुण्यातील विसर्जन मिरवणुकीत गणेशभक्तांसह अनेक नेतेमंडळीही सहभागी झाले होते. महापौर मुक्ता टिळक यादेखील विसर्जन मिरवणुकीत सहभागी होत्या. यावेळी महापौर मुक्ता टिळक यांनी ‘मला आमदार झाल्यासारखं वाटतंय’ गाण्यावर ठेका धरला.

आगामी विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. प्रत्येक राजकीय पक्षाकडून उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. याचदरम्यान गणेशोत्सव आल्याने राज्यातील अनेक भागात इच्छुक उमेदवार गणेश मंडळांच्या गाठीभेटी घेताना पहावयास मिळाले.

Loading...

गुरुवारी लाडक्या गणरायाला सर्वांनी निरोप दिला. विसर्जन मिरवणुकांमध्ये सहभागी होत राजकीय मंडळीनी कार्यकर्त्यांशी पुन्हा एकदा संवाद साधण्याचा प्रयत्न केला.

पुण्यात सकाळपासून भव्य मिरवणुका काढण्यात आल्या. या मिरवणुकीला पुणेकर नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. तर या सर्व मंडळाचे स्वागत महापौर मुक्ता टिळक यांनी अलका चौकात उभारण्यात आलेल्या मंडपामध्ये श्रीफळ देऊन केले.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

Loading...

Loading...