बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

हरभजन सिंग काॅंग्रेसमध्ये जाणार का?; सिद्धूंच्या ट्विटची एकच चर्चा

नवी दिल्ली | आगामी काळात देशात पाच राज्यातील विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. परिणामी सर्व पक्षांनी आपापली तयारी चालू केली आहे. या पाच राज्यांमध्ये पंजाबचा देखील समावेश आहे. गत काही महिन्यांमध्ये पंजाब काॅंग्रेसमध्ये वाद उफाळून आला होता. पण सध्या पंजाबमध्ये काॅंग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये आपच्या आमदारांनी काॅंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. अशातच आता भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग याने पंजाब काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांची भेट घेतल्यानं पंजाबच्या राजकारणात खळबळ माजली आहे. हरभजन सिंग लवकरच काॅंग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे.

काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष सिद्धू यांनी हरभजन सोबतच्या भेटीचा एक फोटो आपल्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर टाकला आहे. आणि ‘शक्यतांनी भरलेला फोटो’ असं कॅप्शन दिलं आहे. परिणामी सध्या हा फोटो मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर धुमाकुळ घालत आहे. हरभजन सिंगने काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये जाणार नाही, असं वक्तव्य केलं होतं.

दरम्यान, हरभजन सिंगला काॅंग्रेस अमृतसरमधून निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. परिणामी आता काॅंग्रेसमध्ये हरभजन खरंच प्रवेश करणार का? फक्त नावालाच चर्चा होणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

पाहा ट्विट-


थोडक्यात बातम्या 

महाराष्ट्राचं टेन्शन वाढलं! मराठवाड्यापाठोपाठ आता विदर्भात Omicronचा शिरकाव

“…म्हणून ओबीसी आरक्षण धोक्यात आलंय”; पंकजा मुंडेंची घणाघाती टीका

‘ती’ वाईट बातमी आली अन् राजनाथ सिंहांनी भाषण थांबवलं

पोर्नोग्राफी केस: अश्लील व्हिडीओ प्रकरणी राज कुंद्राला न्यायालयाचा मोठा दिलासा

83च्या ‘त्या’ मिस्ट्री बाॅलची कहाणी 38 वर्षांनंतरही उलघडली नाही; पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More