बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जेसीबीनं एका रात्रीत काढता, लाज वाटली पाहिजे”

बेळगाव | बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी शिवसेना नेेते संजय राऊत बेळगावात गेले आहेत. संजय राऊत बेळगावात पोहचताच बेळगावचं वातावरण तापलं आहे. संजय राऊत येण्याच्या आधीच संयुक्त महाराष्ट्र चौकीतील सभेसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने बांधलेले व्यासपीठ तोडलं गेलं. त्यानंतर देखील संजय राऊत यांनी सभा घेतली. त्यात त्यांनी कन्नडिगांवर जोरदार हल्ला चढवला.

महाराष्ट्राने मनात आणलं आणि फक्त पाणी बंद केलं तर तडफड होईल. पण आम्ही तसं करत नाही. कारण आम्ही माणुसकी बाळगतो. बेळगावमध्ये खूप वर्षांनी वाघ सिंहाचा खेळ सुरु झाला आहे. त्यामुळे इथं आता माकडांचं काम नाही, अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.  शिवाजी महाराज नसते तर, पाकिस्तानच्या सीमा कर्नाटकापर्यंत आल्या असत्या. तुमची सुंता झाली असती. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जेसीबीने रात्री काढता, लाज वाटली पाहिजे, अशा शब्दात राऊतांनी कन्नडिगांवर जोरदार हल्ला चढवला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पश्चिम बंगालमध्ये परिवर्तन करण्यासाठी फिरत आहे. तुम्ही बेळगामध्ये काय घडतंय ते इथं येऊन पाहा, इथं खून पडत आहेत. तुम्हाला पश्चिम बंगालमधील अन्याय दिसतो, मग बेळगावातील दिसत नाही का?, असा प्रश्न संजय राऊत यांनी मोदी-शाहांना केला आहे.

दरम्यान, बेळगावात उतरलोय. कर्नाटक सरकारकडून दडपशाहीला सुरूवात केली आहे. संयुक्त महाराष्ट्र चौकीतील सभेसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने बांधलेले व्यासपीठ तोडले. तरीही सभा होणारच !, गोळ्या चालवल्या तरी हरकत नाही. ही अस्मितेची लढाई झाली आहे, असं ट्विट संजय राऊत यांनी केलं होतं.

थोडक्यात बातम्या-

“बंद काळात रिकाम्या थाळ्या वाजवून पोट भरणार नाही, भरलेल्या थाळ्याच द्याव्या लागतील”

भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याला कोरोनाची लागण; ट्विट करत दिली माहिती

“शरद पवारांनी स्वत:च्या स्वार्थासाठी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं”

कोहलीनं शाहबाज अहमदला चेंडू सोपवला अन् सामना बंगळुरुच्या बाजूने झुकला

“आपण कुणाच्या भानगडीत पडत नसतो, आपला नाद करायचा नाय”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More