बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“जागतिक स्तरावर नोंद घेतली जाईल, असं स्मारक राज्य सरकार आणि केंद्र सरकार तयार करेल”

मुंबई | भारतरत्न, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं काल रविवारी निधन झालं. त्यांच्या जाण्यानं संगीत क्षेत्राचं मोठं नुकसानं झालं आहे. विविध क्षेत्रातून लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. अशातच आता भाजपकडून लता मंगेशकर यांचं स्मृतीस्थळ उभारण्यात यावं, अशी मागणी केली जात आहे.

भाजप नेते राम कदम यांनी शिवाजी पार्क येथे लता मंगेशकर यांचं स्मृतीस्थळ उभारण्यात यावं, अशी मागणी केली आहे. याच्यावर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काहीजण लतादीदींच्या स्मारकाची मागणी करत असले तरी त्यांचं स्मारक उभारणं काही सोपी गोष्ट नाही. त्या कोणी राजकारणी नव्हत्या. जागतिक स्तरावर नोंद घेतली जाईल, असं स्मारक राज्य सरकार आणि केंद्र सरकार तयार करेल, असं संजय राऊत म्हणाले.

लता मंगेशकर यांच्या स्मृतीस्थळावरुन कोणीही राजकारण करु नये, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता लतादीदींच्या स्मृतीस्थळावर काय निर्णय घेण्यात येईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या – 

“शिवाजी पार्क मैदानावर गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं स्मृतीस्थळ उभारण्यात यावं”

बापलेकीचा भावनिक क्षण! सुप्रिया सुळेंनी स्वतःच्या हातांनी शरद पवारांना घातले बूट

लता दीदींच्या अंत्यसंस्कारावेळी शाहरुख खान थुंकला की फुंकला?, पाहा नेमकं काय घडलं

‘मला पुन्हा जन्म मिळाला तर…’; लतादिदींचा ‘तो’ भावनिक व्हिडिओ व्हायरल

लता मंगेशकर अनंतात विलीन, शिवाजी पार्कमध्ये झाले अंत्यसंस्कार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More