बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अवकाळी पावसाचा राडा, त्यातच हवामान खात्याकडून ‘या’ मोठ्या संकटाचा इशारा

नवी दिल्ली  | राज्यात थंडी सुरू असतानाच सर्वदूर अवकाळी पाऊस पडत आहे. मुंबईसोबतच पुण्याला मुसळधार पावसाने (Heavy Rain) झोडपून काढलं आहे. अवकाळी पावसामुळे बळीराज्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यातच आता हवामान विभागाकडून चक्रीवादळाचा (Cyclone) इशारा देण्यात आला आहे. (The meteorological department has issued a Jawad cyclone warning)

ओडिशा सरकारकडून (Government of Odisha) जवाद चक्रीवादळाचा (Jawad Cyclone) इशारा देण्यात आला आहे. ओडिशाच्या किनारपट्टीला 4 डिसेंबरपासून हे वादळ धडकण्याचा शक्यता आहे. या चक्रीवादळाचे नामकरण सौदी अरेबियाने (Saudi Arabia) जवाद असे केले आहे. हे चक्रीवादळ आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) आणि ओडिसाच्या किनारपट्टी भागातून जाणार आहे.

जवाद चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ओडिशा सरकारकडून किनारपट्टी भागातील 13 जिल्ह्यांना इशारा दिला आहे.  या जिल्ह्यातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. हवामान विभागाकडून गजपती, गजपती, गंजम, पुरी, जयसिंहपूर या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

दरम्यान, भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, दक्षिण अंदमानच्या समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे. यासोबतच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून त्याची तिव्रता वाढत आहे. 2 डिसेंबरला म्हणजेच आज त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता निर्माण करण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या-

“मी मेल्यानंतर…..” सर्वांना हसवणाऱ्या कुशल बद्रिकेची भावनिक पोस्ट

मुख्यमंत्र्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, मात्र ‘या’ कारणामुळे घरीच राहणार?

ॲमिटी विद्यापीठाचं मोठ पाऊल, अमेरिकेतल्या तीन विद्यापीठासोबत करार

‘माझ्यासोबत त्याला शारिरीक संबंध ठेवायचे होते…’; प्रसिद्ध मालिकेतील अभिनेत्रीच्या आरोपाने खळबळ

मोदी सरकारची भन्नाट योजना; मुलगी 18 वर्षाची होताच मिळतील 65 लाख!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More