बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्यात दिवसभर संततधार पाऊस; राज्याच्या ‘या’ भागात मुसळधार पावसाचा इशारा

पुणे | राज्यात थंडी सुरू असतानाच पावसाने पुनरागमन केले आहे. मुंबई आणि कोकणाला  मुसळधार पावसाने (Heavy rain) झोडपून काढल आहे. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात  पाऊस पडला. तसेच बुधवारी  पुणे परिसरात जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. त्यातच राज्यात पुढील 5 दिवसात तीव्र हवामानाचा इशारा देण्यात आला आहे.(Heavy rain warning for next five days in Maharashtra)

लक्ष्यदीप, मालदीवजवळ चक्रीवादळाच्या पट्ट्यामुळे  कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. यामुळे राज्यात कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई आणि मराठवाड्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यातच पुन्हा एकदा कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मध्यम  ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

अरबी समुद्रातून येणाऱ्या ढगांमुळे हवामान विभागाने राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. किनारपट्टीवरील गोवा, सिंधूदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे, पालघर, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे, अहमदनगर, नाशिक, औरंगाबाद या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच येत्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

दरम्यान, हवामान विभागाकडून  पालघर, नाशिक, धुळे, नंदूरबार या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबई, पुणे, ठाणे आणि  कोकणासह मध्य महाराष्ट्र  आणि मराठवाड्याला यलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. या दरम्यान मच्छिमारांनी अरबी समुद्रात जाऊ नये, असं आवाहन के. एस होशाळीकर यांनी  केलं आहे.

थोडक्यात बातम्याः

“आम्हाला KL Rahul संघात हवा होता पण…”,रिलीज होताच धक्कादायक खुलासा

Omicronचा धोका वाढतोय; केंद्र सरकारचं महाराष्ट्राला तातडीचं पत्र

“एका राज्यापुरता मर्यादीत राजकीय पक्ष…”, नाना पटोलेंचं जोरदार प्रत्युत्तर

Winter: हिवाळ्यात ठणठणीत रहा; आहारात करा ‘या’ 6 पदार्थांचा समावेश

लागला की मेळ! ना काॅंग्रेस, ना भाजप…’या’ भेटीमुळे देशात तिसऱ्या आघाडीची चर्चा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More