बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोदी सरकारने निर्लज्जपणाच्या सर्व मर्यादा पार केल्या आहेत – नाना पटोले

मुंबई | पेट्रोल-डिझेलची दरवाढ करुन दिवसाढवळ्या जनतेच्या कष्टाच्या कमाईवर दरोडा घालणारे केंद्रातील भाजप सरकार लुटारु आहे. मोदी सरकारने निर्लज्जपणाच्या सर्व मर्यादा पार केल्या आहेत. अशी जोरदार टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. नाना पटोले यांच्यासह विधिमंडळ काॅंग्रेस पक्षाचे नेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात तसेच काँग्रेस मंत्री व आमदारांनी सायकलवरुन प्रवास करत अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी विधान भवनात पोहोचले.

पेट्रोल-डिझेल व स्वयंपाकाच्या गॅसमध्ये प्रचंड दरवाढ करुन केंद्रातील मोदी सरकारने जनतेचे जगणे मुश्किल केले आहे. इंधन दरवाढीचा विरोध करण्यासाठी काॅंग्रेसचे सर्व मंत्री, आमदार आणि नेत्यांनी मंत्रालयासमोरील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन केले.

आंतराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर निचांकी पातळीवर असताना केंद्र सरकार इंधनावर भरमसाठ करवाढ करुन लूट करत आहे. त्यात आणखी 18 रुपये रस्ते विकास सेसच्या माध्यमातून तर 4 रुपये कृषी सेसच्या माध्यमातून घेतले जात आहेत. करांशिवाय पेट्रोलची किंमत 32 रुपये 72 पैसे प्रती लिटर आणि डीझेसची किंमत 33 रुपये 46 पैसे प्रति लीटर आहे,  असं नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात आज पुन्हा 25 रुपयांची वाढ झाली आहे. जनतेमध्ये या महागाई विरोधात प्रचंड रोष आहे. जनता महागाईने होरपूळन गेली आहे. थंडीमूळे दरवाढ झाल्याचा जावाई शोध लावून केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी लोकांच्या जखमेवर मीठ चोळले आहे, असंही नाना पटोले यावेळी म्हणाले.

थोडक्यात बातम्या –

“आदित्य ठाकरेंनी सांगितल्यानं पब आणि बार बिनधास्त सुरु”

…तर मी थेट राजीनामा दिला असता- सुजय विखे

‘दादांच्या पोटातलं ओठावर आलं’; ‘या’ मुद्दयावरून अजित पवार देवेंद्र फडणवीसांमध्ये जुंपली

आम्ही भिकारी नाही, वाटेल तो संघर्ष करू आणि आमच्या हक्काचं घेऊ- देवेंद्र फडणवीस

धक्कादायक! विधानभवनातील ‘इतके’ जण सापडले कोरोना पाॅझिटिव्ह

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More