Top News महाराष्ट्र मुंबई

“मोदी सरकारकडून घटनेवर हल्ला, राज्यघटनेचं संरक्षण करावं लागेल”

मुंबई | आज 75 वा  प्रजासत्ताकदिनानिमित्त राज्यातील प्रदेश काँग्रेस कार्यालय मुख्यालयात प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. ध्वजारोहणानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

देशाची मूल्यवान आदर्श घटना, अखंड भारताचं भवितव्य जिच्या हाती आहे तिला अलीकडच्या सहा वर्षात धक्का लागतोय अशी भीती वाटते. मोदी सरकार घटनांच्या मुल्ये पाळत नाही. त्यामुळं घटनेचं संरक्षण करावं लागणार आहे, असं थोरात यांनी म्हटलं आहे.

तसंच समता हे घटनेचं मुलभूत तत्त्व आहे, तेच काँग्रेसचं तत्त्व आहे, असंही  बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं.

दरम्यान, केंद्र सरकारनं लागू केलेल्या कृषी कायद्यांना विरोध म्हणून तसंच काही प्रमुख मागण्यांसाठी मुंबईत हजारो शेतकरी जमा झाले. मात्र राज्यपाल राजभवनात नसल्यानं शेतकऱ्यांना त्यांच्या मागण्याचं निवेदन राज्यपालांना देता आलं नाही.

थोडक्यात बातम्या-

‘राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी संविधान स्तंभ उभारा’; सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

प्रख्यात गायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांना पद्मविभूषण

शरद पवारांनंतर अजित पवारांनीही साधला राज्यपालांवर निशाणा; म्हणाले…

बुलेट ट्रेन दिल्यामुळेच जपानच्या माजी पंतप्रधानांना पुरस्कार- संजय राऊत

अनाथांच्या मातेला ‘पद्मश्री’; सिंधुताईंच्या ‘या’ भाषणानं साऱ्यांच्याच डोळ्यात अश्रू

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या