बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

निवडणुका संपल्या! आता मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!

नवी दिल्ली | कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची आकडा वाढत चालल्याचं दिसत आहे. कोरोना वाढत असताना ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे अनेकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. देशातील स्थिती भयानक होत चालली आहे. त्यामुळे मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती समजत आहे.

कोरोना वाढत असल्यामुळे नरेंद्र मोदी देशभरात लॉकडाऊन करणार असे संकेत मिळत आहेत. परंतू मोदींनी लॉकडाऊन करणार नसल्याचं सांगितलं होतं. मात्र टास्क फोर्स, अनेक तज्ज्ञ आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर नरेंद्र मोदी देशव्यापी लॉकडाऊन न करण्याच्या निर्णयावर फेरविचार करु शकतात असं समजतंय.

देशात कोरोनाची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे देशव्यापी लॉकडाऊनसाठी मोदींवर दबाव वाढला आहे. त्यात जर गरज पडल्यास लॉकडाऊन करण्यात यावं, अशी सूचनासर्वोच्च न्यायालयाने दिली आहे. हा निर्णय घेण्यापुर्वी दुर्बल घटकांचा केंद्र सरकारने विचार करावा, असंही न्यायालयाने म्हटलं आहे. त्यामुळे मोदी यावर काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, पाच राज्यांच्या निवडणुकाही पार पडल्या असून त्यांचे निकालही समोर आले आहेत. यामध्ये सर्वांचं लक्ष लागून असलेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीत ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसने आपली सत्ता राखली आहे.

थोडक्यात बातम्या- 

रिक्षाचालकाची रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या; धक्कादायक कारण आलं समोर

“भारतनाना माफ करा, पैसा आणि सैनिकांच्या पत्नीचा अपमान करणारी प्रवृत्ती जिंकली”

कोलकाता नाईट रायडर्सच्या गोटात भीतीचं वातावरण, आजचा सामना पुढे ढकलला!

“…म्हणून पाटलांना कोल्हापूर सोडून पुण्यातील एका महिलेचा सुरक्षित मतदारसंघ निवडावा लागला”

“पराभवाची सवय करून घेतली पाहिजे, कारण आता वारंवार फटके बसणारेत”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More