बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुहुर्त ठरला! ‘या’ दिवशी राहुल वैद्य आणि गर्लफ्रेंण्ड दिशा अडकणार विवाहबंधनात

मुंबई | बिग बॉस फेम गायक राहुल वैद्य आणि त्याची गर्लफ्रेंड दिशा परमार यांच्या लग्नाच्या चर्चां मोठ्या प्रमाणात रंगल्या होत्या. दोघे कधी लग्न करणार याकडे चाहत्यांच्या नजरा खिळल्या होत्या. अखेर आता चाहत्यांची प्रतिक्षा आता संपली असून राहुल आणि दिशानं त्यांच्या लग्नाची घोषणा केली आहे.

दिशा आणि राहुलनं सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाच्या तारखेची घोषणा केली आहे. लग्नाची तारीख चाहत्यांसोबत शेअर करत राहुल आणि दिशानं लिहिलं, आमच्या कुटुंबाच्या शुभ आशीर्वादासह ही गोष्ट तुम्हाला सांगताना आम्हाला अत्यंत आनंद होतोय. येत्या 16 जुलै रोजी आमचा शुभ विवाह आयोजित करण्यात आला आहे. आमच्या आयुष्याची नवीन सुरुवात करत असताना आम्हाला तुमच्या आशीर्वादाची आणि शुभेच्छांची गरज आहे.

ही पोस्ट शेअर करत राहुलनं लिहिलं की, #TheDisHulWedding. राहुलनं शेअर केलेल्या पोस्टवर अनेकांककडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

दरम्यान, ‘बिग बॉस’ च्या 14व्या पर्वात राहुलनं दिशा परमारला प्रपोज केलं होतं. राहुलनं दिशाच्या वाढदिवसाच्या दिवशी एका पांढऱ्या रंगाच्या टीशर्टवर लिपस्टिकने ‘माझ्याशी लग्न करशील का’ असं लिहित टेलिव्हिजनवरून दिशाला प्रपोज केलं होतं. त्यानंतर व्हॅलेंटाइन्स डेला शोमध्ये येऊन दिशानं राहुलच्या प्रपोजला होकार दिला होता.

 

थोडक्यात बातम्या – 

‘वासरू मारलं म्हणून कुणी गाय मारत असेल, तर…’; फडणवीसांचा सूचक इशारा

“…पण हे मुंबई मॉडेल नाही, तर मृत्यूचं मॉडेल”

“12 आमदारांचं निलंबन हा लोकशाहीचा खून”

अधिवेशनादरम्यान आजही सभागृहात राडा; आमदार रवी राणांनी विधानसभेतील ‘राजदंड’ पळवला

हेलिकॉप्टरमधून नवरदेवासोबत खासदार अमोल कोल्हेंनी केली दमदार एन्ट्री!

‘भास्कर जाधव यांना संरक्षण देणार’; गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची विधानसभेत ग्वाही

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More