बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! देवेंद्र फडणवीस-शिंदे यांच्या सरकार स्थापनेचा मुहूर्त ठरला, ‘या’ तारखेला शपथ घेणार

मुंबई | उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या राजीनाम्यानंतर आता देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वात नव सरकारचा 1 जुलैला शपथविधी होण्याची शक्यता आहे. भाजप सत्तास्थापनेचा दावा करणार आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे दोन्ही नेते 1 जुलैला शपथ घेण्याची शक्यता आहे.

उद्या हंगामी अध्यक्षांची निवड होणार असल्याची शक्यता आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत पक्षाचे निम्म्याहून अधिक आमदार सोबत आहेत.

दरम्यान, भाजपसोबत सत्ता स्थापन करताना शिंदे गटाला काय मिळणार? याकडे आता राज्याचं लक्ष लागलं आहे. तसेच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदी असतील, अशी माहिती समोर आली आहे.

दरम्यान,शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सोपवला आणि महाराष्ट्रातलं महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. त्यानंतर महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी भाजपच्या हालचाली सुरू झाल्या असल्याची माहिती समोर आली आहे. भाजप (BJP) नेते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची चर्चा होणार आहे. या चर्चेत नव्या मंत्रिमंडळा संदर्भात चर्चा होणार आहे. दुपारपर्यंत नव्या मंत्रिमंडळाचे चित्र स्पष्ट होणार असल्याचं बोललं जात आहे.

थोडक्यात बातम्या- 

“बाळासाहेबांची शिवसेना आम्ही गगनाला गवसणी घालण्याइतपत मोठी करु”

मोठी बातमी! शिंदे गटाचा आदित्य ठाकरेंसह 14 आमदारांना इशारा

“चाणक्य आज लाडू खात असतील, सर पण तुमचा सच्चेपणा अधिक काळ टिकून राहिल”

एकाबाजूला ठाकरे सरकार कोसळलं दुसरीकडे बच्चू कडूंना रस्ते घोटाळ्यात क्लीन चिट!

महाराष्ट्रात येणारं भाजप सरकार पुढील 25 वर्षे चालेल- देवेंद्र फडणवीस

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More