बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अन् तो क्षण जेव्हा इतिहास घडला! आयर्लंडला धक्का देत नामिबियाचा सुपर-12 मध्ये प्रवेश

नवी दिल्ली | आयर्लंडला पराभूत करत नामबिया संघाने प्रथम टी-20 विश्वचषकमध्ये इतिहास नोंदवला आहे. हा सामना नामबियाने 8 गडी राखून जिंकत विश्वचषकमधील सुपर-12 मध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे नामबिया संघाचं क्रिकेटविश्वात सध्या कौतुक केलं जात आहे.

विश्वचषक मधील अ गटाच्या पात्रता फेरीत खेळताना आर्यलॅंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आयरीश फलंदाज स्टर्लिंग आणि केविन ब्रायन या सलामीवीरांनी 62 धावांची भागीदारी रचली. स्टर्लिंगने 38 तर ब्रायनने 25 धावांची महत्वपूर्ण खेळी साकारली. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या बालबीरीनने 21 धावा करत संघाला 125 धावांपर्यंत पोहचलं.

प्रत्युत्तरात नामबियाच्या फलंदाजानी आयरीश गोलंदाजाचा घामटा काढला. सलामीला आलेल्या नामबियाचा फलंदाज क्रेग विलयम्सने 15 धावांवर बाद झाला. त्यानंतर झेन ग्रीनने डाव संभाळत 24 धावांचं योगदान दिलं. तर नामबिया संघाचा कर्णधार गेऱ्हार्ड इरास्मूस यांने  3 चौकार आणि 1 षटकाराच्या साहाय्याने 53 धावांची तुफानी खेळी साकारली आणि 126 धावांचं लक्ष्य 18.3 षटकमध्ये पूर्ण करत नामबिया संघानं विश्वचषकमध्ये इतिहास रचला.

दरम्यान, शारजा क्रिकेटच्या मैदानात नामबियाने आयर्लंड संघावर विजय मिळवत प्रथमच विश्वचषक स्पर्धेत प्रवेश केला आहे. त्यामुळे भारताचा माजी खेळाडू व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी देखील नामबिया संघाचं अभिनंदन केलं आहे. त्याचबरोबर ‘तो क्षण जेव्हा इतिहास घडला’, असं ट्विट करत आयसीसीने देखील नामबिया संघाचं कौतूक केलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

ठरलं तर! अचानक रद्द झालेला ‘तो’ निर्णायक कसोटी सामना पुढच्या वर्षी होणार

‘गिरीश महाजन यांना पैशांचा घमंड असल्यानं…’; रोहित पवारांची घणाघाती टीका

“…तर मी स्वत: अशोक चव्हाण यांचा जाहीर सत्कार करेन”

कोंबड्यांमुळे नवा व्हायरस पसरण्याची भीती; तज्ज्ञांनी दिला ‘हा’ गंभीर इशारा

1975 नंतर पावसाचा नवा विक्रम! ‘या’ कारणामुळे थांबला परतीचा पाऊस

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More