बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

माकडं विहिरीमध्ये डोकवायची, लोकांकडे पाहायचीत पाहणी केल्यावर सर्वांनाच बसला धक्का!

लखनऊ | उत्तर प्रदेशमधील कानपूर येथे धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका कोरड्या विहरीवर काही माकडं बसली होतीत. ही माकडं वारंवार लोकांना काही तरी इशारा करत होती. त्यानंतर लोकांनी जाऊन विहरीत पाहिलं. यावेळी लोकांना मोठा धक्का बसला. या घटनेनं सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

हिरामन पुरामध्ये एक महिला सकाळी शौचास बाहेर गेली होती. त्यानंतर ती बेपत्ता झाली. गावकऱ्यांनी तिचा शोध सुरु केला, मात्र तरी तिचा काहीच पत्ता लागला नाही. यादरम्यान गावातील कोरड्या विहरीवर दोन-तीन माकडं काहीतरी इशारा करत होती. माकडं सतत विहरीत जायचीत आणि बाहेर येऊन लोकांकडे पाहायचीत.

माकडांचे इशारे पाहून एका व्यक्तीला माकडाचं पिल्लू विहरीत पडलं असेल, असा समज झाला. म्हणून संबंधित व्यक्ती गोपाल सिंह चौव्हान यांनी जाऊन विहरीत डोकवलं. यावेळी बेपत्ता असलेली महिला मृत अवस्थेत विहरीत अढळून आली. यानंतर चौव्हान यांनी जाऊन लोकांना बोलावून आणलं.

दरम्यान, पोलिसांना माहिती दिल्यानंतर महिलेचा मृतदेह बाहेर काढण्याचे कार्य सुरु करण्यात आले. 6 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर महिलाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. संबंधित महिला मुलीच्या अॅडमिशनला घेऊन चिंतेत असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच तिने विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

थोडक्यात बातम्या-

‘या’ भीतीमुळे अमरावतीमधील संपूर्ण गाव रात्रभर झोपलं नाही

पुण्यातील धक्कादायक घटना; नर्सचा ड्रेस परिधान करुन महिलेने पळवलं बाळाला

करदात्यांसाठी मोठी बातमी; इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत वाढवली

IND vs ENG: कोरोनाच्या भीतीमुळे वरिष्ठ खेळाडूचा पाचवी टेस्ट खेळण्यास नकार?

गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशीच मुंबईतलं लसीकरण राहणार बंद!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More