Top News

2020 मध्ये ‘कोरोना’ नव्हे तर ‘हा’ शब्द ॲानलाईन डिक्शनरीत सर्वाधिक शोधला गेला!

न्यूयॉर्क | 2020 मध्ये कोरोना नाही तर पॅनडेमिक हा शब्द सर्वाधिक शोधला गेला आहे. मरियम वेब्स्टर डिक्शनरीच्या वार्षिक शब्दाचा मान यंदा ‘पॅनडेमिक’ या शब्दाला मिळाला आहे.

मरियम वेब्स्टर डिक्शनरीनुसार, पॅनडेमिक या शब्दाचा अर्थ एखाद्या आजाराचा अनेक देशांमध्ये एकाचवेळी प्रसार होणं आणि मोठ्या प्रमाणात लोकांना त्याचा फटका बसणं असा आहे.

वर्षभरात पॅनडेमिक हा शब्द असंख्य वेळा शोधला गेला आहे. तसेच एक विक्रमच या शब्दाने नोंदवला आहे, असं मरियम वेब्स्टर डिक्शनरीने म्हटलं आहे.

कधी कधी केवळ एक शब्द जणू एका युगाची व्याख्या करतो. तसाच यंदा ‘पॅनडेमिक’ हा शब्द या अपवादात्मक अशा कठीण वर्षासाठी अगदी अचूक ठरला आहे. 2020 असं म्हटलं की सर्वात आधी ‘पॅनडेमिक’ हा शब्द मनात येतो, असं मरियम वेब्स्टर डिक्शनरी प्रकाशनानं म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

भारतीय क्रिकेटपटू पार्थिव पटेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती!

कोरोनाबाधित रुग्णाच्या घराबाहेर पोस्टर्स लावू नका- सर्वोच्च न्यायालय

फडणवीस सरकारचा ‘हा’ निर्णयही ठाकरे सरकारने केला रद्द

“मुंबईच्या ‘या’ रुग्णालयात केला जाणार कोरोना लसीकरणाचा पहिला प्रयोग”

पृथ्वीवर एलियन्स लपले आहेत; इस्त्राईलच्या संशोधकाचा खळबळजनक दावा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या