बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पोलीस अधिकारी असलेल्या मुलाचा मृतदेह पाहून आईनेही सोडले प्राण; बिहारमधील घटनेनं संपूर्ण देश हळहळला

पाटणा | बिहारमधील किशनगंज ठाणेदार अश्विनी कुमारयांना जमावानं ठार मारल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. आता मुलाचा मृतदेह पाहताच त्यांच्या आईचा देखील मृत्यू झाल्याची माहिती आहे. या घटनेनं संपूर्ण देशात हळहळ व्यक्त केली जात आहे.

अश्विनी कुमार यांच्या आई मुलाचा मृतदेह पाहू शकल्या नाहीत. मृतदेह पाहताच त्यांनीही प्राण सोडले. या घटनेनंतर त्या संपूर्ण परिसरातील वातावरण आणखीनच अस्वस्थ झाले. अश्विनी कुमार आणि त्यांच्या आईवर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

मृत अश्विनी बिहारमधील किशनगंज नगर पोलीस ठाण्याचे ठाणेदार होते. एका लुटमारीच्या प्रकरणात छापेमारी करण्यासाठी ते बंगालमध्ये गेले होते. त्यांच्यासोबत पोलिसांचं एक विशेष पथकही होतं. हिंसक जमावाने त्यांच्यावर हल्ला करून अश्विनी कुमार यांची हत्या केली होती.

अश्विनी कुमार यांच्या हत्या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. फिरोज आलम, त्याचा भाऊ आबूजार आलम आणि आई सहीनूर खातून असं या आरोपींची नावं आहेत. फिरोज हा या प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

थोडक्यात बातम्या- 

वाझेच्या अडचणीत वाढ; टीआरपी घोटाळ्यात घेतली होती एवढ्या लाखांची लाच

पुण्याला PM केअर फंडातून मिळालेले व्हेंटिलेटर निघाले खराब; अधिकाऱ्याने अजित पवारांकडे केली तक्रार

“प्रकाश जावडेकर दिल्लीत बसुन जे ज्ञानामृत देत आहेत त्याची महाराष्ट्राला गरज नाही”

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत मनसेचा राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा!

धक्कादायक! महाराष्ट्रातील ‘या’ शहरांमध्ये एकही व्हेंटीलेटर बेड शिल्लक नाही

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More