बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आईला कोरोना, बेड मिळेना, मात्र मुलगा आणि मुलीनं हार मानली नाही; एका धैर्याची कहाणी!

नवी दिल्ली | कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक लोकांनी आपला जीव गमावला आहे. अशातच आता बेड्स, रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. यादरम्यान एका महिलेला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्या मुलाने आणि मुलीने मिळून जे केलं ते कौतुकास्पद आहे. विशेष म्हणजे महिलेला बेड न मिळून देखील त्या कोरोनातून बऱ्या झाल्या आहेत.

संबंधित घटना ही उत्तर प्रदेशच्या लखीमपूर येथील आहे. येथील एका भाऊ-बहिणीने आपल्या आईला कोरोनापासून वाचविण्यासाठी थक्क करणारे प्रयत्न केले आहेत. आईला हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नव्हता म्हणून त्यांनी त्यांच्या कारलाच कोरोना वॉर्ड बनवून तिच्यावर यशस्वी उपचार केले . त्यांच्या आईला डायलेसीसची गरज होती. दोघा बहीण भावाने कारच्या छतावर ऑक्सिजन सिलिंडर ठेवून कारमध्येच आईवर उपचार सुरु केले. ते दोघे पुढील सीटवर बसले आणि मागच्या सीटचा आईसाठी बेड बनवला. अखेर पाचव्या दिवशी त्या मातेला हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध झाला.

पाच दिवसांनी तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली. आधीचे पाच दिवस आणि नंतरचे पाच असे दहा दिवस या बहीण भावाने हॉस्पिटलच्या पार्किंगमध्येच कारमध्ये राहून दिवस काढले. मात्र या काळात भावालाही कोरोनाचे संक्रमण झाले.

20 एप्रिलला 25 वर्षांची संबंधित बहिण पायल आणि तिचा 23 वर्षांचा भाऊ आकाश लखीमपुर खीरीहून त्यांच्या आईला डायलिसीस करण्यासाठी लखनऊला घेऊन आले होते. आईचा डायलिसीस झाल्यावर सायंकाळी ते घरी जातील, अशा अंदाजात ते होते. मात्र त्याच दिवशी त्यांच्या आईला ताप आला. यामुळे आरटी-पीसीआर टेस्ट करण्यात आली. कोरोनाचा संशय आल्याने त्यांनी टेस्ट केली.

दुसऱ्या दिवशी आईची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. यामुळे दरवेळी जे हॉस्पिटल डायलेसिस करत होते त्यांनी डायलेसीस करण्यास नकार दिला. मित्रांच्या मदतीने एक हॉस्पिटल डायलेसीस करण्यास तयार झाले. मात्र आईची ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्याने त्यांनीही नकार दिला. आम्ही सरकारकडे मदत मागितली, परंतू काहीच हाती लागले नाही, असं त्यांनी सांगितलं.

दोघा बहिण-भावाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांना बाहेरून 1300 रुपयांचे ऑक्सिजनचे 5 कॅन मिळाले. जे काही मिनिटंच चालले. ऑक्सिजन लेव्हल सुधारल्यानंतर त्या हॉस्पिटलने डायलेसीस करण्यास होकार दिला. 23 एप्रिलला लखनऊमध्येच ऑक्सिजन सिलिंडर कुठे मिळतो का हे ते पाहत होते. अखेर वडिलांनी लखिमपूरहून ऑक्सिजन सिलिंडर आणला.

दरम्यान, वडिलांनी ऑक्सिजन सिलिंडर आणल्यानंतर त्यांच्या सुरक्षिततेसाठी त्यांना पुन्हा माघारी पाठवले. 24 एप्रिलला राम मनोहर लोहिया हॉस्पिटलमध्ये बेड मिळाला. 30 एप्रिलला त्यांच्या आईला बरं वाटल्यानंतर हॉस्पिटलने त्यांना घरी सोडलं. याकाळात आकाशलाही कोरोनाची लागण झाली. मात्र तो देखील आता बरा झाल्याचे पायलने सांगितले.

थोडक्यात बातम्या-

नाशिकमध्ये छातीत दुखून अचानक होणाऱ्या मृत्यूंबाबत संभ्रम कायम 2 दिवसांत चक्क 5 जणांचा मृत्यू 

“मन की बात आहे पण मनातलं नाही, मुख्यमंत्री आहेत पण रस्त्यावर नाही, सगळंच रामभरोसे”

धक्कादायक! कोरोनाबाधित वृद्ध जोडप्याची ‘या’ कारणामूळे रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या

देशातील कोरोनाबाधित रुग्णसंख्येत घट, जाणुन घ्या दिलासादायक आकडेवारी

विवाहीत प्रेयसीला भेटायला जाणं पडलं महागात, गावकऱ्यांनी दोघांना विजेच्या खांबाला बांधलं अन्…

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More