बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शाळेत जाण्यासाठी आईने केली बळजबरी, मुलाने केली पालकांचीच हत्या

माॅस्को | आपल्या मुलांनी शाळेत जावं, चांगलं शिक्षण घ्यावं शिक्षण पूर्ण करुन आयुष्यात यशस्वी व्हावे अशी सगळ्याच पालकांची इच्छा असते. त्यासाठी मुलांनी शाळेत जावे यासाठी पालक मुलांना बळजबरी करतात. अशी बळजबरी करणे एका कुटुंबीयाच्या जीवावर बेतले आहे. एका अल्पवयीन मुलाने आई-वडिलांसह लहानग्या बहिनीची कुऱ्हाडीने हत्या केली असल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे.

रशियामधील ही धक्कादायक घटना असून पोलिसांना या हत्येचा उलगडा करण्यास बराच वेळ लागला. 17 वर्षीय वदीम गोरबुनोव यांने आपल्या आई-वडिलांसह लहान बहिणीची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. हत्या केल्यानंतर वडिलांच्या मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी त्याने चेहरा व शरिरावर आणखी वार केले आणि आपले कपडे घातले. जेणेकरून पोलिसांना मुलाचा मृतदेह असल्याची खात्री पटली पाहिजे.

आरोपी मुलाच्या वडिलांचे वय 40 वर्ष होते. ते वेल्डर म्हणून काम करत होते. हत्येनंतर आरोपी मुलगा पळून गेला होता. तपासाच्या सुरुवातीला वडिलांनीच घरातील सगळ्यांची हत्या केली, असं पोलिसांना वाटलं होतं. त्यानंतर न्यायवैद्यक प्रयोगशाळेत मृतदेह आणि इतर बाबींची योग्य तपासणी करण्यात आली. त्यावेळी तो मृतदेह वडिलांचा असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी आरोपी वदिमला घटनास्थळापासून 362 किमी दूर असलेल्या ठिकाणावरून अटक केली.

दरम्यान, पोलीस चौकशीत आरोपी वदिमने आपणच हत्या केली असल्याची कबुली दिली. वदिमला शाळेत जाण्याची इच्छा नव्हती. तर त्याची आई बळजबरीने त्याला शाळेत पाठवण्याची तयारी करत होती. त्या मुद्यावरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. त्यावेळी संतापलेल्या वदिमने आपल्या आई-वडील आणि बहिनीची हत्या केली.

थोडक्यात बातम्या –

धक्कादायक! अंबानींच्या घराबाहेरील स्फोटकं असलेल्या कारमालकाचा संशयास्पद मृत्यू

‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌नवऱ्याने ‌व्हाॅटसअॅपला तिचा डीपी न ठेवल्याने पत्नीने केलं असं काही की….

नोकरीची सुवर्णसंधी; RBI मध्ये ‘इतक्या’ पदांची भरती सुरू

‘ये मैं हूं, ये मेरा घर और ये मेरा पोछा है…’; राखीने शेअर केला बाथरूममधील व्हिडीओ

“मोदी सरकारची चमचेगिरी करणाऱ्यांच्या उलाढाली स्वच्छ आहेत काय?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More