बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

डाॅक्टर जावयानं केलेला अपमान सहन न झाल्याने सासूने केलं ‘हे’ धक्कादायक कृत्य

बीड | बीड येथील परळीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या लेकीचं लग्न झालं की मुलीच्या माहेरच्या मंडळींना अनेक वेळा अपमान सहन करावा लागतो. मुलीच्या काळजीपोटी तो सहन देखील केला जातो. मात्र संबंधित ठिकाणी एका आईला तिच्या जावयाने केलेला अपमान सहन न झाल्याने तिने जे केलं, त्यानं सर्वांनाच, विशेषतः तिच्या मुलीला धक्काच बसला आहे.

संबंधित महिलेचं नाव सुशीला विश्वनाथअप्पा बेंबळगे असं असून तिच्या लेकीचं नाव नमिता असं आहे. काही वर्षांपूर्वी नमिताचा विवाह पुण्यातील डॉक्टर अमोल रकेट याच्याशी झाला होता. लग्नाच्या काही दिवसांपासूनच सासरच्या मंडळीनी नमिताला व तिच्या कुटुंबीयांना अपमानजनक वागणूक द्यायला सुरुवात केली. लग्नात नमिता आणि तिच्या माहेरच्या लोकांनी चुकीची माहिती देऊन दिशाभूल केल्याचा आरोप ठेवत सासरच्या लोकांनी नमिताची 60 वर्षीय आई सुशीला विश्वनाथअप्पा बेंबळगे यांचा सतत अपमान केला.

लग्नात दिलेलं स्त्रीधन तळतळाट लावून दिल्यानं आमच्या घरावर दैवी कोप झाला आहे, असा आरोप करत सासरच्या मंडळींनी 2 लाख रुपये रक्कम आणि सोन्याची एक अंगठी देण्याची मागणी केली. एवढंच नव्हे तर, मृत सुशीला, त्यांचे पती आणि मुलगा यांना जावई डॉ. अमोल रकटे यांच्या पाया पडण्यास भाग पाडलं. शिवाय, नमितावर चारित्र्याचा संशय घेऊन तिला सतत अपमानित केलं.

दरम्यान, आपल्या मुलीला होणारा त्रास आणि जावयानं केलेला अपमान जिव्हारी लागल्यानं सासू सुशीला विश्वनाथअप्पा बेंबळगे यांनी तीन आठवड्यांपूर्वी गळफास घेऊन स्वतःला संपवलं आहे. याप्रकरणी मुलगी नमितानं परळी शहर पोलीस ठाण्यात नवऱ्यासहित सासरच्या अन्य मंडळींविरोधात तक्रार दाखल केली आहे. फिर्यादीच्या तक्रारीनंतर, शनिवारी पती, सासू, सासरा, नणंद  या चार जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

थोडक्यात बातम्या-

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या माजी अध्यक्षांचं कोरोनानं निधन, लसीचे दोन्ही डोस घेतलेले!

‘केम छो वरळी विचारणारा आमदार कुठे आहे?’; निलेश राणे यांचा वरळीकरांना सवाल

देशातील कोरोना रूग्णसंख्येत लक्षणीय घट, पण मृतांचा आकडा चिंताजनक

कोरोना रुग्णांवर ‘म्युझिक थेरपी’, झिंगाट गाण्यावर कोरोना रूग्ण थिरकले ; पाहा व्हिडीओ

चक्रीवादळ टळलं तरी मुंबईसह उपनगरात ‘हे’ तास धोक्याचे 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More