बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मन सुन्न करणारी घटना; नवरा-बायकोच्या भांडणामुळे दोन मुलांना गमवावा लागला जीव

पुणे | पुण्यातील बारामती येथे काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. बारामतीमध्ये रहिवासी असणाऱ्या एका महिलेने आपल्या मुलांसह पाण्यात उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र या घटनेमध्ये दुर्दैवाने दोन मुलांचा जीव गेला आणि आईला वाचवण्यात यश आला आहे. या घटनेनंतर संपुर्ण शहर सुन्न झालं आहे.

बारामतीमधील पिंपळी येथे रहिवासी असणाऱ्या सुर्यवंशी दाम्पत्यामध्ये काही कारणांवरुन कडाक्याचं भांडण झालं होतं. पतीचं नाव अतुल सुर्यवंशी असं आहे तर पत्नीचं नाव अंजली सुर्यवंशी असं आहे. भांडणानंतर दोघांनी मिळून आपला वाद मिटवला देखील होता. मात्र त्या भांडणांचा राग अंजली यांच्या डोक्यात तसाच राहिला.

भांडणाच्या रागातून अंजली यांनी पहाटे तीन वाजता आपल्या मुलांना घेऊन गावातील खाडी गाठली. अंजली यांंना शौर्य नावाचा मुलगा आणि दिव्या नावाची मुलगी आहे. खाडी येथे अंजली यांनी आपल्या दोन मुलांसोबत पाण्यात उडी मारली. त्यानंतर अंजली जीवाच्या आकंताने आरडाओरडा करु लागल्या. शेजारी असलेल्या दूध डेअरीतील लोकांनी धाव घेत तीघांना बाहेर काढलं.

दरम्यान, तीघांनाही तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र यावेळी दोघा मुलांना मृत घोषित करण्यात आलं असून आईचा जीव वाचवण्यात आला आहे. क्षुल्लक रागातून संपुर्ण संसाराची राखरांगोळी झाल्यानंतर अंजली यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

थोडक्यात बातम्या-

विवाहित प्रेयसीला मित्रासोबत शरीरसंबध ठेवण्यास केली जबरदस्ती; नकार देताच उचललं धक्कादायक पाऊल

“15 लाखांसाठी भारतीय गेल्या सात वर्षांपासून थांबलेत, तुम्हीही थोडी वाट बघा”

दुचाकीस्वाराने पोलिसाला फरफटत नेलं; सीसीटीव्ही फुटेज समोर, पाहा व्हिडीओ

‘माझ्यासोबत झोप मी तुला काम देतो’; ‘या’ अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव

ट्रकचा ब्रेक फेल झाला म्हणून चालकाने केलं रिव्हर्स ड्रायव्हिंग, पाहा व्हिडीओ

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More