बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

हार मानेल ती आई कसली! 2 वर्षाच्या बाळाला कोरोनाची लागण झाल्यानं आईनं घेतला ‘हा’ निर्णय

औरंगाबाद| दिवसेंदिवस वाढत चाललेल्या कोरोना रूग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण आला असल्याचं दिसत आहे. या काळात काही रूग्णांना उपचारही मिळत नाहीत. त्यामुळे अनेकांना मृत्यू तोंड द्यावे लागत आहे. देशात कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि मृत्यूचं प्रमाण या पार्श्वभूमीवर तिसऱ्या लाटेची शक्यताही तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे.

अशातच औरंगाबाद याठिकाणी एका 2 वर्षाच्या लहान बाळाला कोरोणाची लागण झाली होती. ते बाळ जगेल की नाही? याचीही खात्री नव्हती. पण बाळाच्या आईनं धीर न सोडता पीपीई किट घालून बाळासोबत रुग्णालयात थांबण्याचा निर्णय घेतला. 10 दिवसांच्या उपचारानंतर ते बाळ एकदम ठीक झाल्यावर त्या बाळाच्या आईनं सुटकेचा निश्वास सोडला.

नांदेडमधील या बाळाला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. स्थानिक रुग्णालायात उपचार केल्यानंतर बाळाची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली. मात्र काही दिवसांतचं बाळाला पुन्हा कोरोनाची लक्षणं दिसू लागली. बाळाचं सर्व शरीर निकामी झालं होतं. बाळाला तीव्र ताप येणं, कमी रक्तदाब, मेंदूज्वर, आतड्यांवर सूज, लघवी कमी होणं असे विविध त्रास व्हायला लागले. त्यामुळं बाळाला औरंगाबाद या ठिकाणी नेण्याचा सल्ला नांदेडमधील डॉक्टरांकडून देण्यात आला.

दरम्यान, डॉक्टरांचा औषधोपचार आणि पीपीई किट घालून बाळाच्या आईनं केलेल्या संघर्षामुळं बाळाला मृत्यूच्या दारातून माघारी आणता आलं. आपलं बाळ संकटात सापडल्यानंतर आई काहीही करून बाळाची संकटातून सुटका करू शकते. याचा प्रत्यय या घटनेनं पहायला मिळाला.

थोडक्यात बातम्या – 

“शरद पवारांचा नातू म्हणून रोहित पवारांना वेगळा न्याय का?”

भारतातील कोरोनाचा अनुभव सांगताना ‘या’ क्रिकेटपटूला अश्रू अनावर, पाहा व्हिडीओ!

आनंदाची बातमी! पुण्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे, वाचा आजची दिलासादायक आकडेवारी

तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांच्या आई वगसम्राज्ञी कांताबाई सातारकर यांचं निधन

कोरोना रूग्णांचा तणाव कमी करण्यासाठी आरोग्य कर्मचारी करतायेत ‘हे’ काम, पाहा व्हिडीओ

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More