बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

हार मानेल ती आई कसली! व्हेंटिलेटरवर असणाऱ्या कोरोनाबाधित मातेला कन्याप्राप्ती

पुणे | आई ती आईच असते, आपल्या लहान लेकरासाठी ती कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याची जिद्द ठेवते. याचाच प्रत्यय देणारी घटन बारामतीमध्ये घडली आहे. फुफ्फुसात 100 टक्के संसर्ग झालेल्या कोरोनाबाधित गर्भवती महिलेने आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर एका बााळाला जन्म दिला आहे. कोरोनामुळे भयभीत होत खचणाऱ्या रुग्णांसमोर या महिलेने आदर्श समोर ठेवला आहे.

गर्भारपणाचा 9 महिन्यांचा कालावधी पुर्ण झाल्यावर 28 वर्षीय गर्भवती महिला रूग्णालयात दाखल झाली. घरी संपुर्ण कुटुंब कोरोनाबाधित होतं. 10 एप्रिलला महिलेला प्रसुतीकळा सुरु झाल्या होेत्या त्यावेळी तिची अतिशय नाजुक अवस्था होती. रक्ताचे रिपोर्ट देखील चांगले नव्हते आणि एचआरसीटी स्कोअर अवघा 25 होता. डॉक्टरांनी धोका पत्करत महिलेची प्रसुती करण्याचा निर्णय पत्करला आणि गुंतागुंतीची शस्त्रक्रिया पार पाडली.

अखेर डॉक्टरांच्याही प्रयत्नांना यश आलं आणि व्हेंटीलेटरवर असणाऱ्या या महिलेची सुखरुप प्रसुती झाली. तिने एका गोंडस मुलीली जन्म दिला. बाळाला चिरायुच्या अतिदक्षता विभागात ठेवलं. महत्त्वाचं म्हणजे बाळाच्या कोरोना चाचणीचा अहवाल हा निगेटीव्ह आला. बाळाला जन्म दिल्यानंतर ती महिला 13 दिवस व्हेंटिलेटरवर अतिदक्षता विभागात अत्यावस्थ होती. डॉक्टरांनी तिचं मनोबल वाढवण्यासाठी बाळाला तिच्या मांडीवर ठेवलं आणि 45 दिवसांच्या उपचारानंतर ती महिला कोरोनामुक्त झाली.

दरम्यान, आजारातील अत्यवस्थ गर्भवतींच्या प्रसुतीसाठी असणारे ‘हाय रिस्क ऑबेस्टेट्रीक युनिट’ यावेळी उपयुक्त ठरलं. मेहता हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या पथकाने हा कामगिरी केली. डॉ.विशाल मेहता यांनी याबाबत माहिती दिली.

थोडक्यात बातम्या- 

“खत दरवाढीला प्रत्यक्षात शरद पवार यांचेच धोरण कारणीभूत”

‘कोरोनाचा दुसरा डोस घ्यायला जर उशिरा झाला तर…’; संशोधनातून समोर आली महत्त्वाची माहिती

दिवंगत आमदार रमेश वांजळेंच्या दोन्ही सख्ख्या मेव्हुण्यांचं कोरोनाने निधन

अजित पवारांना प्रमुख करणं म्हणजे लांडग्यानं मेंढरांचं नेतृत्व करण्यासारखं आहे- गोपीचंद पडळकर

“देवेंद्रजी काय राव तुम्ही कधीही मदतीला पोहोचता, मग इथे मुख्यमंत्र्यांनाही निघावं लागतं ना”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More