बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एक महिन्याच्या मुलीचा आईनेच घेतला जीव; कारण ऐकून सुन्न व्हाल

रत्नागिरी | रत्नागिरी जिल्ह्यात माय-लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. चिपळूण तालुक्याच्या सावर्डे आबिट गावात दुसऱ्यांदा पण मुलगी झाली या रागात एका महिलेने आपल्या पोटच्या मुलीचा जीव घेतला. सावर्डे आबीट या गावात राहणाऱ्या एका महिलेने रागात आपल्या चिमुकल्या 1 महिन्याच्या मुलीला पाण्याच्या बकेटमध्ये बुडवून मारल्याची घटना घडली आहे.

शौर्या प्रवीण खापले असं त्या मृत बाळाचं नाव असून या प्रकरणी सुरुवातीला अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु, चौकशीदरम्यान पोलिसांसमोर सदरील आईने आपला गुन्हा कबूल केला. गुन्हा कबूल करताना त्या मुलीच्या आईने दुसरीही मुलगीच झाल्याने मी त्रस्त होते त्याच रागात मी हे पाऊल उचलल्याचं उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन बारे यांना सांगितलं आहे. या निर्दयी महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून मुलीची हत्या केल्याप्रकरणी तिला पोलिसांनी अटक केली आहे.

लहान निरागस आणि निष्पाप जीव यांच्यावर राग काढताना काही निर्दयी लोकांना काहीच वाटत नाही. काही दिवसांपूर्वीच खाऊसाठी पैसे मागितले म्हणून वडिलांनी आपल्या मुलाची हत्या केली होती. तसेच नवरा बायकोच्या भांडणात पत्नी पोलिसात तक्रार द्यायला गेली असताना घरी असणाऱ्या चिमुरडीवर ब्लेडने वार करून पित्यानेच तिची हत्या केली होती.

आत्तापर्यंत अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. यामुळे आता या समाजातील नराधमांना कायद्याची भीती राहिली नाही का? असा प्रश्न पडतो. संबंधित प्रकरणात पोटच्या आईनेच मुलीची हत्या केल्याची कबुली दिल्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. तसेच माय-लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी ही घटना आहे.

थोडक्यात बातम्या-

आणीबाणीच्या मुद्द्यावरुन संजय राऊत यांनी राहुल गांधींना फटकारलं, म्हणाले…

“…त्या महिलांचीच चुकी आहे; मुंडे, शेख, वाघमारे, राठोड अगदी निरागस आहेत”

…अन् भररस्त्यात तो वाजले की बारावर थिरकला; रिक्षावाल्याच्या लावणीवर तुम्हीही व्हाल फिदा, पाहा व्हिडिओ

“अशोक चव्हाण ताठर माजी मुख्यमंत्री, गडी ऐकायलाच तयार नाही”

धनंजय महाडिक यांनी सतेज पाटील यांच्यावर केला ‘हा’ गंभीर आरोप

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More