Top News

भाजपला मोठा धक्का, ‘या’ खासदाराने पक्षाला दिली सोडचिठ्ठी

अहमदाबाद | गुजरातमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. गुजरात भाजपमधील ज्येष्ठ नेत्यांपैकी एक असलेल्या मनसुख वसावा यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

मनसुख वसवा हे भरूच मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, लोकसभा सदस्यत्वाचाही आपण राजीनामा देणार असल्याचं वसावा यांनी स्पष्ट केलं आहे. मनसुख वासवा यांनी नेमका का राजीनामा दिला आहे. याचं नेमकं कारण स्पष्ट होऊ शकलेलं नाही.

मी पक्षासोबत निष्ठेने राहिलो आहे. तसे पक्ष आणि जीवनातील सिद्धांताचे पालन करण्यामध्ये खबरदारी बाळगली आहे. मात्र शेवटी मी एक माणूस आहे आणि माणसाकडून चूक होते. त्यामुळे मी पक्षाचा राजीनामा देत आहे. तसेच संसदेचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी मी सदस्यत्वाचाही राजीनामा देणार आहे, असं मनसुख वसावा म्हणालेत.

भरुच लोकसभा मतदारसंघातील भाजपचे खासदार असलेल्या मनसुखभाई धनजीभाई वसावा यांनी 28 डिसेंबर रोजी गुजरात प्रदेश भाजप अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पत्र लिहून आपल्या निर्णयाची माहिती दिली आहे.

थोडक्यात बातम्या-

मला मुंबईत राहण्यासाठी केवळ गणपती बाप्पाच्या परवानगीची गरज- कंगणा राणावत

मराठी माणसाला अभिमान हवाच! अशी कामगिरी करणारा रहाणे पहिलाच खेळाडू

राऊत कुटुंबाच्या ‘मनी ट्रेल, कॅश ट्रेल’ची चौकशी करा- किरीट सोमय्या

नववर्षाचं स्वागत करताना ‘या’ ६ सूचनांचं पालन करा; अन्यथा होऊ शकते कारवाई

“सरकारला जे लोक आवडत नाहीत, त्यांना दहशतवादी घोषित केलं जाऊ शकतं”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या