बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘खासदाराने माझा गळा आवळला’, मार्शलांचा गंभीर आरोप, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | राज्यसभेत राज्यांना आरक्षणाचे अधिकार देणारं विधेयक मंजुर झालं. त्यानंतर राज्यसभेत साधारण विमा दुरूस्ती विधेयक मांडलं गेलं. त्यावेळी खासदारांनी पुन्हा राडा सुरू केला. त्यानंतर राज्यसभेत गदारोळ झाल्याचं पहायला मिळालं. विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत सभापतींना घेराव केला. त्यानंतर राज्यसभेत धक्काबुक्की झाल्याचं पहायला मिळालं. त्यानंतर महिला खासदारांना धक्काबुक्की केल्याचा आरोप विरोधीपक्षातील खासदारांनी केला होता. त्यानंतर आता मार्शलांनी खासदारांवर गंभीर आरोप केले आहेत.

खासदारांनी गोंधळ घातल्यानंतर राज्यसभेत मार्शलांना बोलवण्यात आलं. त्यावेळी कर्मचाऱ्यांनी आणि मार्शलांनी खासदारांना धक्काबुक्की केल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला होता. त्यावेळी खासदारांनी कागदपत्रे उधळली होती. त्यानंतर 40 खासदारांना सभागृहातून बाहेर काढण्यात आलं. या सर्व घटनेचा अहवाल मागवला गेला. त्यानंतर या अहवालात मार्शलांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर त्याचा सीसीटीव्ही फुटेज देखील व्हायरल झाला आहे.

सेक्युरिटी असिस्टंट अक्षिता भट आणि राकेश नेगी यांनी राज्यसभेत झालेल्या घटनेचा अहवाल सेक्युरिटी संचालकांकडे सादर केला. या अहवालात खासदारांवर गंभीर आरोप केले आहेत. खासदारांनीच आपल्यासोबत गैरवर्तन केल्याचं या अहवलात म्हटलं गेलं आहे. पुरूष खासदारांना पुढे जाता यावं, यासाठी राज्सभेतील महिला खासदारांनी सुरक्षा कडं तोडलं. महिला खासदार छाया वर्मा आणि फुलो देवी यांनी मला फरफटत नेलं, असा आरोप मार्शलांनी केला आहे.

दरम्यान, खासदारांना सभापतीच्या आसनाजवळ जाता यावं यासाठी माकप खासदार एलामारन करिम यांनी माझा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे माझा श्वास गुदमरला, असा आरोप देखील मार्शलांनी केला आहे. त्याच्या या आरोपानंतर एकच खळबळ उडाली. तर शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी देखील सुरक्षा घेरा तोडण्याचा प्रयत्न केल्याचं मार्शलाचं म्हणणं आहे.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या-

के. एल राहुलचं दमदार शतक; तब्बल 31 वर्षांनी केला ‘हा’ विक्रम

नाशिकच्या लाचखोर फरार महिला शिक्षणाधिकारी यांची संपत्ती पाहुन तुम्हीही व्हाल थक्क!

दिलासादायक! खाजगी शाळांच्या फीमध्ये 15 टक्के कपात, ठाकरे सरकारचा महत्वपुर्ण निर्णय

रोहितने इंग्लंडच्या गोलंदाजांचा काढला घामटा, अँडरसनच्या अफलातून चेंडूने शतकापासून ठेवलं दूर; पाहा व्हिडीओ

मोठी बातमी! संजय राठोडांनी शरीरसुखाची मागणी केल्याप्रकरणी महिलेची पोस्टाने पोलिसात तक्रार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More