बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बहुप्रतिक्षित IPO बाजारात धडकणार! ‘या’ कंपनीबाबत केंद्र सरकार लवकरच मोठी घोषणा करणार

नवी दिल्ली | जानेवारीपासून शेअर बाजारात मोठी वाढ होताना दिसत आहे. कोरोना काळात आयटी सेक्टर वगळता इतर अनेक सेक्टरला मोठा फटका बसला. तर दुसरीकडे भारतीय अर्थव्यवस्था देखील रसातळाला गेली होती. अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी ‘बॅड बँकांना’ विकण्याचा निर्णय घेतला होता. तर एकेकाळी अर्थव्यवस्थेला हातभार लावणारी ‘एलआयसी’ कंपनीची मत्तेदारी सोडण्याचा देखील निर्णय घेतला. त्यामुळे आता लवकरच गुंतवणूकदारांना एलआयसीमध्ये गुंतवणूक करण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे.

भारतील विमा क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी एलआयसी म्हणजे भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या आयपीओबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. एलआयसी आयपीओ बाजारात उतरवण्यासाठी केंद्र सरकारच्या हालचालींना वेग आला आहे. आयपीओ बाजार आणण्यासाठी लवकरच केंद्र सरकार DHRP दाखल करणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता गुंतवणूकदारांच्या नजरा देखील या आयपीओकडे लागून राहिल्याचं दिसून येतंय.

पुढच्या वर्षी जानेवारीपर्यंत DHRP दाखल करण्याची मुदत केंद्र सरकारने निश्चित केली आहे. त्यामुळे या आयपीओमधून केंद्र सरकार तब्बल 60 ते 75 हजार कोटी रूपये उभा करण्याच्या तयारीत आहे. या आयपीओच्या व्यवस्थापनासाठी केंद्र सरकारने 10 मर्चंट बँकांची नियुक्ती देखील केली आहे. त्यामुळे आयपीओनंतर कंपनीचे बाजारमुल्य तब्बल 10 लाख कोटी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, एलआयसी ही विमा क्षेत्रातील सर्वांत मोठी कंपनी आहे. गेल्या वर्षभरापासून गुंतवणूकदार एलआयसीच्या आयपीओची वाट बघत होते. बाजारात एकूण टक्केवारीपैकी सुमारे 69 टक्के वाटा हा एलआयसीचा आहे. त्यामुळे हा आयपीओ बाजारात येताच अनेक गुंतवणूकदार हा आयपीओ मिळवण्याची तयारीत आहेत.

थोडक्यात बातम्या-

वापरलेल्या मास्कची पायपुसणी, धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यावर महापालिकेची कारवाई!

“तृप्ती देसाई सुद्धा मला भिडताना विचार करुन भिडायच्या”

पिंपरी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; रावण गँगमधील 4 जणांना केली अटक

“महिना 100 कोटी वसुलीचे तरी कुठे लेखी आदेश दिले होते?”

“फडणवीस सत्तेत असताना शेतकऱ्यांनी शेती करणं सोडलं होतं”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More