बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भारताचा सर्वात जवळचा मित्र असलेल्या ‘या’ देशाला मुंबई महापालिकेचं लसींसाठी साकडं

मुंबई | महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात लाॅकडाऊनची घोषणा केली आहे. त्यानंतर लसीकरणावर मोठ्या प्रमाणात भर देण्यात आला.  लसीकरण मोहीमेत देशात सर्वाधिक लसीकरण पुर्ण केलेलं राज्य म्हणुन विक्रम महाराष्ट्राच्या नावे नोंद झाला. पण गेल्या काही दिवसांपासुन महाराष्ट्रात कोरोना लसींचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे.

लसींच्या तुटवड्यावरून राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच मुंबई महापालिकेने ग्लोबल टेंडर काढुन आंतरराष्ट्रीय लस उत्पादक कंपन्यांना निविदा भरण्यास सांगितलं होतं. पण या टेंडरला योग्य तो प्रतिसाद न मिळाल्याने त्याला मुदतवाढही देण्यात आली होती. उद्या या ग्लोबल टेंडरची मुदत संपणार आहे आणि आतापर्यंत फक्त 4 लस वितरक कंपन्यांनी यात सहभाग नोंदवला आहे.

याच पार्श्वभुमीवर मुंबई महापालिकेने आता थेट रशियन सरकारकडेच लसींची मागणी केली आहे. रशियाची स्पुतनिक-व्ही ही लस सध्या कोरोनावर मोठ्या प्रमाणात प्रभावी असल्याचं बोललं जात आहे. त्यातच मुंबई पालिकेने रशियन सरकारच्या बाहेर देशात लस पुरवणाऱ्या आरडीआयएफ या संस्थेला पत्र लिहुन लसींची मागणी केली आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त ईक्बालसिंह चहल यांनी रशियन सरकारच्या संस्थेला पत्र लिहुन 1 कोटी लस पुरवण्याची विनंती केली  आहे.

मुंबई महापालिकेच्या ग्लोबल टेंडरला आतापर्यंत एकाही लस उत्पादक कंपनीचा प्रतिसाद मिळालेला नाही. सर्व प्रतिसाद मिळालेल्या कंपन्या या लस वितरक कंपन्या आहेत. पण वितरक कंपन्या एवढ्या मोठ्या प्रमाणात लसींचा पुरवठा करतील का? हा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे. लसींच्या पुरवठ्यासंदर्भात मुंबईतील रशियन दुतावासाकडेही पाठपुरावा केला असल्याची माहीती समोर आली आहे. यासंबंधी आता रशिया नेमकं काय पाऊल उचलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या –

आनंदाची बातमी! पुण्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे, वाचा आजची दिलासादायक आकडेवारी

‘…अन् भर रस्त्यात मलायकाला रोखलं आजोबांनी’; सोशल मीडियावर व्हिडीओ तुफान व्हायरल

रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर अवघ्या दिड महिन्यातच महाराष्ट्रातील ‘या’ शहराचा रक्तसाठा तिपटीने वाढला

‘…तर भाजपच्या खासदारकीचा राजीनामा देईल- संभाजीराजे भोसले

कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या ‘या’ शहरातील नव्या कोरोनाबाधितांची संख्या 500च्या खाली

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More