बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

घरात रक्ताच्या थारोळ्यात आढळलेल्या महिलेच्या हत्येचं गूढ उलगडलं; धक्कादायक कारण आलं समोर

पुणे | पुण्यातील धनकवडी परिसरात काल एका महिलेचा मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ उडाली होती. सहकारनगर पोलिसांनी या हत्येचं रहस्य अवघ्या काही तासातच उलगडलंय. संबंधित महिलेचं नाव कल्पना घोष असं असून त्या 32 वर्षाच्या होत्या.

धनकवडी येथील एका इमारतीत कल्पना एकट्या राहत होत्या. परवा दिवशी कल्पना यांनी त्यांच्या शेजारी राहत असणाऱ्या एका महिलेकडून फोनचा चार्जर आणलेला. दुसऱ्या दिवशी तोच चार्जर परत आणण्यासाठी शेजारील महिला कल्पना यांच्या घरी गेल्या. यावेळी कल्पना त्यांच्या घरात रक्ताच्या थारोळ्यात मृत अढळून आल्या होत्या. याबाबतची माहिती पोलिसांना देताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन तपास केला.

तपासात धनकवडी परिसरातील एका बिअर बारमध्ये काम करणाऱ्या एका व्यक्तीने कल्पना यांची हत्या केल्याचं समोर आलं. संबंधित आरोपीचं नाव अविनाश साळवे असं आहे. आरोपीचा शोध लागताच पोलिसांनी अविनाशला ताब्यात घेतलं. त्यानंतर अविनाशची कसून चौकशी करण्यात आली. यादरम्यान मृत कल्पना घोष यांना दारुचं व्यसन असल्याचं उघड झालं. कल्पना, आरोपी अविनाशला फोन करून दमदाटी करून त्याच्याकडून दारू मागवत असतं.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी कल्पना यांनी अविनाशला शिवीगाळ केली होती. तसेच त्याच्या अंगावर देखील थुंकल्या होत्या. याच रागातून आरोपी अविनाशने धारदार शस्त्रानं वार करून कल्पना घोष यांची हत्या केली असल्याचं उघड झालं आहे.

थोडक्यात बातम्या-

‘पुण्यातील लहान मुलांचे लसीकरण करा’; बालरोग तज्ज्ञांच्या टास्क फोर्सने दिली महत्वाची सुचना

नियम मोडणाऱ्या वऱ्हाडींना पोलिसांनी शिकवला धडा, पहा काय घडलं..!

कोरोना नसलेल्या लोकांनाही काळ्या बुरशीच्या आजाराचा धोका; तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्वाची माहिती

शहरी भागातील एक तृतीयांश लोकांच्या शरिरात कोरोना अँटीबॉडी; सिरो सर्व्हेतून धक्कादायक माहिती समोर

“राजभवनात भुताटकीचा वावर, एकदा शांतीयज्ञ करून घ्यावा लागेल”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More