बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आठ महिन्यांच्या गर्भवतीची हत्या, अत्यंत धक्कादायक घटनाक्रम आला समोर

भोपाळ | इंदौरमध्ये 8 महिन्यांची गरोदर असलेल्या पूजा अस्के या महिलेची गेल्या आठवड्यात गळा दाबून हत्या करण्यात आली होती. या गर्भवतीच्या हत्या प्रकरणाचा धक्कादायक घटनाक्रम समोर आला आहे. गर्भवती महिलेची सैनिक पतीनेच हत्या केल्याचं तपासात उघड झालं आहे. धक्कादायक म्हणजे आरोपी पतीला त्याच्या दोघा भावांनी खूणासाठी मदत केली.

पूजाच्या पतीने त्याच्या दोघा धाकट्या भावांसह पत्नीची हत्या केली. पूजाचा पती जितेंद्र अस्के 34 व्या बटालियन कंपनीचा कमांडर आहे. तर, दीर राहुल अस्के पोलिस जवान आहे. पोलिसांनी संशयातून दोन्ही दीरांना ताब्यात घेतलं होतं. पूजाचा नवरा जितेंद्र स्वतःला निर्दोष असल्याचं भासवत होता. पोलिसांनी दीरांकडे कसून चौकशी केली असता आरोपींनी हत्येची धडाधड कबुली दिली. दादानेच हत्येचा कट रचल्याचं धाकट्या भावांनी सांगितलं.

पूजा ही आरोपी जितेंद्रची दुसरी पत्नी होती. धारमध्ये राहणाऱ्या अनू नावाच्या महिलेसोबत जितेंद्रचं पहिलं लग्न झालं होतं. तिला जितेंद्रपासून मुलंही आहेत. मात्र ही गोष्ट लपवून जितेंद्रने पूजा उर्फ जान्हवीसोबत दुसरं लग्न केलं. पूजाला जितेंद्रची फसवणूक समजताच भयंकर चीड आली. तिनं थेट अनूला फोन लावला. त्यावरुन दोघींमध्ये वाद झाला.

दरम्यान, अनूनं जितेंद्रला फोन करुन मुलांसह आत्महत्या करण्याची धमकी दिली. त्यामुळं घाबरलेल्या जितेंद्रनं पोलीस भाऊ राहुल आणि मावसभाऊ नवीन यांना घरी बोलवलं. त्यावेळी तिघांनी मिळून पूजाचा काटा काढण्याचा कट रचला. जितेंद्रच्या दोघा भावांनी तिची गळा दाबून हत्या केली. घटनेनंतर, पूजाच्या नातेवाईकांनी जितेंद्रवर गंभीर आरोप केले होते. चौकशीत दोन्ही भावांनी दादाची पोलखोल केली. पोलिसांनी मुख्य आरोपी जितेंद्र अस्के यालाही बेड्या ठोकल्या आहेत.

थोडक्यात बातम्या

#सकारात्मक_बातमी | सुरुवातीला बेड मिळेना, 2 दिवस वाहनातच, आज्जीची अखेर कोरोनावर मात

आईचा मृतदेह नेण्यासाठी मिळाली नाही ॲम्बुलन्स, स्मशानापर्यंतचा प्रवास सुन्न करणारा

18 वर्षावरील नागरिकांना कोरोना लसीसाठी वाट पाहावी लागणार, आरोग्यमंत्र्यांची महत्त्वाची घोषणा

पुण्यात कॅालेजला जाता येता झाली ओळख, मुलगी गर्भवती झाल्यावर बलात्कार झाल्याचं उघड

‘तुम्ही मला बुधवार पेठेत कधी पाहिलं?’; मानसी नाईक भडकली

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More