बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अँड्र्यू सायमंड्सच्या मृत्यूचं गूढ वाढलं, बहिणीने उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे खळबळ

नवी दिल्ली | ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्स (Andrew Symonds) यांच्या मृत्यूच्या बातमीने जगभर खळबळ उडवून दिली. सायमंड्सचा शनिवारी दुर्दैवी कार अपघात झाला आणि त्यातचं त्याचं निधन झाल्याची बातमी समोर आली.

सायमंड्सचा कार अपघातात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली मात्र आता हा नक्की अपघात होता की घातपात असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. अँड्र्यू सायमंड्सची बहिण लुईसने ‘डेलिमेल’ला दिलेल्या एका मुलाखतीत दोन प्रश्न उपस्थित केले आहेत. या प्रश्नांमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

अँड्र्यू शनिवारी रात्री त्या निर्मनुष्य रस्त्यावर एवढ्या रात्री एकटा काय करत होता हा मोठा प्रश्न आहे. कारण अँड्र्यू तिथे एकटा गेल्याची माहिती कुटुंबात कुणालाच नव्हती. त्यामुळे तो तिथे नक्की का गेला हा मोठा प्रश्न आहे, असा प्रश्न लुईसने उपस्थित केला आहे.

दरम्यान, सायमंड्स सोबत त्या गाडीत दोन श्वान देखील होते. या अपघातात ते दोन्ही श्वान वाचले आहेत. त्यामुळे तिथं नेमकं काय झालं? अपाघात झाला त्या ठिकाणी जास्त लोकंही नव्हते. मग अपघात कसा झाला? त्या श्वानांचा जीव कसा वाचला? असे प्रश्न लुईसने उपस्थित केले आहेत. लुईसने उपस्थित केलेल्या या प्रश्नांमुळे सायमंड्सच्या मृत्यूचं गूढ अधिक वाढलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“उद्धव ठाकरेंना राज्याचे मुख्यमंत्री म्हणण्याची लाज वाटते”

केतकी चितळे प्रकरणात तृप्ती देसाईंचा थेट राष्ट्रवादीवर हल्लाबोल, म्हणाल्या…

राष्ट्रवादीच्या आंदोलनावर स्मृती ईराणींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…

‘केतकीचं समर्थनच काय फडणवीसांनी सांगितलं तर सदाभाऊ साडी घालून…’; राष्ट्रवादीची बोचरी टीका

‘हिंमत असेल तर…’; भाजप नेत्याचं उद्धव ठाकरेंना थेट आव्हान

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More