बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नव्या कोरोना व्हायरसचं रहस्य उलगडलं; ‘माणसाच्या शरिरात गेल्यावर…’

मुंबई | गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाने देशभर थैमान घातलं होतं. त्यामुळे देशभरात लसीकरण प्रक्रिया मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत होती. त्यानंतर आता कोरोना रूग्णसंख्या आटोक्यात येताना दिसत आहे. पण कोरोनाची तिसरी लाट लवकरच येण्याची शक्यता आहे. या लाटेत लहान मुलांना धोका असल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यातच आता नव्या कोरोना व्हायरसचं रहस्य उलघडलं आहे.

हैदराबाद सेंटर फाॅर सेल्युलर अँड माॅलिक्युलर बायोलाॅजीसह अनेक इतर संशोधन करणाऱ्या संस्थांनी कोरोना व्हायरसच्या नव्या व्हेरियंटमागील रहस्य उलघडल्याचा दावा केला आहे. एखादा कोरोना व्हायरस व्यक्तीच्या शरिरात गेल्यावर स्वतःच्या शरिरात बदल घडवून आणतो. त्यानंतरच तो दुसऱ्या व्यक्तीच्या शरिरात प्रवेश करतो. त्यातून नवीन व्हेरियंटची निर्मीती होते, असं सेंटर फाॅर सेल्युलर अँड माॅलिक्युलर बायोलाॅजीने म्हटलं आहे.

जवळपास 80 टक्के जिनोमसिक्वेंसिंगनंतर कोरोना व्हायरस नवीन व्हेरियंटच्या स्वरूपात बाहेर येतो, असंही संशोधनातून समोर आलं आहे. काही काळानंतर जर लोकसंख्येचा मागोवा घेतल्यास कोरोना कितपत घातक आहे याची माहिती मिळू शकते, असंही सेंटर फाॅर सेल्युलर अँड माॅलिक्युलर बायोलाॅजीच्या संशोधनच्या निश्कर्षातून समोर आलंय.

दरम्यान, पहिल्या टप्प्यात चीन, जर्मनी, मलेशिया, ब्रिटन, अमेरिका आणि भारतातून जून 2020 मध्ये नमुने गोळा करण्यात आले. त्यातील 1347 नमुन्यांचा अभ्यास देखील केला गेला. त्यात भारताच्या अनेक संशोधन शाखा आणि संशोधकांचा देखील समावेश आहे. या संशोधनामुळे शहरात कोणत्या व्हेरियंटचे कोरोनारूग्ण आहेत, याचा अंदाज येऊ शकणार आहे.

थोडक्यात बातम्या-

नोकरीची बातमी | 1 लाख भारतीयांना ‘ही’ दिग्गज आयटी कंपनी देणार नोकरी

‘…म्हणून राज कुंद्राला अटक केलं’; मुंबई पोलिसांनी सांगितलं कारण

आरबीआयची मोठी कारवाई; ‘या’ बँकेचा परवाना केला रद्द्

“आमच्या पंतप्रधानांनी 700 कोटी पाठवले, तुमच्या मुख्यमंत्र्यांनी काय दिवे लावले ?”

पोस्टाची बंपर योजना, आज पैसे गुंतवा 5 वर्षात 7 लाख मिळवा!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More