नवी दिल्ली | मोदी नावाचा करिश्मा संपूर्ण देशाला माहीत आहे. भारतीय जनता पक्षाचं एकहाती सरकार आणण्यात या नावाचाच सिंहाचा वाटा आहे. दुसरीकडे मात्र या नावाचा त्रास होत असल्याची तक्रार करण्यात आलीय आणि ही तक्रार चक्क मोदींच्याच कुटुंबातील सदस्यानं केल्यानं खळबळ उडाली आहे.
‘मोदी’ नावाचा कामाच्या ठिकाण त्रास होतो, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुतणी सोनल मोदी यांनी केली आहे. याशिवाय मोदी आम्हाला कधी भेटतसुद्धा नाहीत. मी मोदींना 2002 नंतर भेटले नाही, असं सोनल मोदी यांनी म्हटलं आहे. बीबीसीला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी ही भावना व्यक्त केली आहे.
आई हिराबेन यांना भेटायला मोदी जेव्हा येतात तेव्हा आम्हाला तिथे येण्यास परवानगी नसते. मोदी आणि हिराबेन दोघेचं भेटतात. पंतप्रधान पदाच्या शपथविधीला देखील आम्हाला आमंत्रण नव्हते. असा गौप्यस्फोट सोनल मोदी यांनी केला आहे. मोदी नावाचा आम्हाला काहीच फायदा नाही. आम्ही सामान्य जीवन जगतो, असंही त्यानी सांगितलं.
सोनल मोदी सध्या भाजपच्या सक्रीय कार्यकर्त्या आहेत. भाजपसाठी काम करुन ही त्यांना त्याचा मोबदला मिळत नाही. अहमदाबादच्या स्थानिक स्वराज संस्थेत त्यांना निवडणुक लढवायची होती. परंतू फक्त मोदी कुटूंबातील असल्याने मला तिकीट नाकारलं गेलं. माझ्यापेक्षा जास्त काम करणाऱ्या कार्यकर्त्याला तिकीट दिलं असतं तर वाईट वाटणार नाही. परंतू फक्त मोदी कुटुंबातील असल्याने डावलल्याचं दुःख होत असल्याचं सोनल म्हणाल्या आहेत.
थोडक्यात बातम्या-
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील ‘तो’ मुलगा गायब!
पुण्यातील ‘या’ रस्त्यावर 7 किलोमीटर लांबीचा दुमजली उड्डाणपूल होणार!
अशी ही बनवाबनवी!!! ‘एक्स’ची अंगठी चोरुन केलं ‘नेक्स्ट’ला प्रपोज
आता ‘या’ मुलानं लावली सोशल मीडियावर आग, लोक परत परत पाहात आहेत व्हिडीओ!
पुण्यातील ‘या’ उड्डाणपुलाचे काम वर्षभरात संपवा; नितीन गडकरींचे सक्त आदेश