बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावावरून स्थानिक नागरिक आणि राज्य सरकारमध्ये खडाजंगी

मुंबई | नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणावरून स्थानिक नागरिक विरुद्ध राज्य सरकार अशी खडाजंगी सध्या पाहायला मिळत आहे. येथिल नागरिक राज्य सरकार विरोधात नामकरणावरून निदर्शनं करत आहेत. तसेच राज्य सरकारला विरोधही करताना पाहायला मिळत आहेत.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यावर राज्य सरकार ठाम असल्याचं पाहायला मिळत आहे. तर दुसऱ्या बाजूला स्थानिक नागरिक शेतकरी कामगार पक्षाचे दिवंगत नेते दि.बा पाटील यांचं नाव देण्यात यावं, अशी मागणी करत आहेत. त्यामुळे आता स्थानिक नागरिक व राज्य सरकारमध्ये खडाजंगी पाहायला मिळत आहे.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यामुळे आता नागरिकांचा रोष पत्करून राज्य सरकार बाळासाहेब ठाकरे यांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महाराष्ट्र सरकार विरोधात स्थानिक नागरिकांनी बंड पुकारल्याने सरकार नरमाईची भूमिका घेणार की, नागरिकांच्या विरोधात जाऊन दि.बा पाटलांच्या नावाऐवजी बाळासाहेब ठाकरेंचं नाव देणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या –

शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंतच्या बिनव्याजी कर्जासह मंत्रिमंडळाच्या बैठकीतील 6 मोठे निर्णय

धक्कादायक! कोरोनानंतर आणखी एक जीवघेणा व्हायरस आला समोर, ‘या’ ठिकाणी सापडला पहिला रुग्ण

नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर; आता मिळणार एवढ्या लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज

ग्रेट ग्रँड मस्तीमधील अभिनेत्रीने ट्रेनरचे घेतलेले पंचेस पाहून तुम्हालाही बसेल धक्का, पाहा व्हिडीओ

“मुंबईत सगळं काही ब्रिटिशांनी केलं, मग शिवसेनेनं काय केलं?”

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More