बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘समृद्धी’ला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव; राज्य सरकारच्या निर्णयावर शिक्कामोर्तब

नागपूर | विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र व कोकणातील 10 जिल्हे थेट आणि 14 जिल्ह्यांना अप्रत्यक्षरीत्या जोडणाऱ्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचं नाव ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग’ असं करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे.

समृद्धी महामार्ग प्रकल्पासाठी 3 हजार 500 कोटी रुपये इतकी रक्कम शासनाकडून भागभांडवल अनुदान म्हणून देण्याच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयाचाही शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या रुपाने महाराष्ट्रातच नाही तर देशात द्रुतगती महामार्गाची मुहूर्तमेढ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी रोवली होती.

विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलून टाकण्याची क्षमता नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गात आहे. त्यामुळे या महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी गृहमंत्री आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मंत्रिमंडळ बैठकीत केली होती.

दरम्यान, यासंदर्भातील शासन निर्णय आज जारी करण्यात आला. त्यामुळे आता हा महामार्ग ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग’ या नावाने ओळखला जाणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More