मुंबई | मनोरंजन क्षेत्रात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली आहे. यंदाच्या 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आलीये.
सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमाचा राष्ट्रीय पुरस्कार ‘गोष्ट एका पैठणी’ची या चित्रपटाला जाहीर करण्यात आला आहे. दिग्दर्शक शांतनू रोडे यांच्या ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. तर पार्श्वगायनात राहुल देशपांडे (Rahul Deshpande) यांनी बाजी मारली आहे.
दरम्यान, जून या मराठी चित्रपटातील अभिनेता सिद्धार्थ मेनन याला विशेष पुरस्कार जाहीर झाला आहे. गोदाकाठ आणि अवांछित या चित्रपटांसाठी अभिनेते किशोर कदम यांना विशेष ज्युरीचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
चित्रपट, साहित्य आणि कला क्षेत्रात सर्वोत्कृष्ट आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलाकारांना भारत सरकारकडून हे पुरस्कार दरवर्षी दिले जातात. या पुरस्कारांची सुरुवात 1954 साली करण्यात आली होती. त्यासाठी जानेवारी 1953 ते डिसेंबर 1953 या कालावधीत प्रदर्शित झालेल्या चित्रपटांची निवड करण्यात आली होती.
थोडक्यात बातम्या-
मोठी बातमी! बंडखोर आमदाराचा उद्धव ठाकरेंवर अत्यंत गंभीर आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ
’13 ऑगस्ट ते 15 ऑगस्टदरम्यान प्रत्येकाने आपल्या घरावर…’; मोदींचं जनतेला आवाहन
“गद्दारांनी प्रश्न विचारायचे नसतात, तुमची तेवढी लायकी नाही”
शिंदे सरकारचा गणेश मंडळांना दिलासा, परवानगी मिळवण्यासाठी ‘ही’ आहे सोपी प्रक्रिया
‘सोनिया गांधी, राहुल गांधी असोत किंवा संजय राऊत…’; ईडी चौकशीवरून राऊतांचं मोठं वक्तव्य
Comments are closed.