राष्ट्रवादी आक्रमक; परमबीर सिंह यांच्या संपत्तीबाबत केली ‘ही’ मोठी मागणी
मुंबई | परमबीर सिंह यांच्या ‘लेटरबॉम्ब’ मुळे अडचणीत आलेले महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन त्यांचे आरोप तथ्यहीन असल्याचं स्पष्ट केलं. पण आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या प्रकरणावर आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या संपत्तीची चौकशी करण्यात यावी अशी मागणी राज्य शासनाला केली आहे. एका आयपीएस अधिकाऱ्याची संपत्ती तपासल्यानंतर तो किती प्रामाणिकपणे काम करत होता हे जगासमोर येईल, असं शशिकांत शिंदे यांनी म्हटलं आहे.
मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून परमबीर सिंह यांची बदली त्यांच्यावर आरोप झाल्यानंतर करण्यात आली. तरीही त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यामुळे, यामागे नेमका कोणाचा हात आहे हे सर्वांना माहीत आहे आणि दिल्लीला गेल्यावरच असा आमुलाग्र बदल कसा होतो? असा प्रश्नदेखिल शिंदेनी उपस्थित केला आहे.
‘लेटरबॉम्ब’ प्रकरणामुळे अनिल देशमुख यांचं गृहमंत्रीपद धोक्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी परमबीर सिंह यांच्या संपत्तीबाबत केलेल्या मागणीने आता वेगळ्या वादाला तोंड फुटलं आहे. शशिकांत शिंदे यांनी या प्रकरणाची चौकशी करून महाराष्ट्रातील जनतेसमोर सत्य आणावं आणि अशा अधिकाऱ्यांना पाठीशी घालू नये अशी विनंती राज्य सरकारला केली आहे.
थोडक्यात बातम्या –
दिवंगत सुशांत सिंग राजपूतच्या ‘छिछोरे’ला मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
काही होणार नाही; प्रकरण वाझे साहेबांकडेच आहे; मनसुख हिरेन यांचं भावासोबतचं संभाषण ‘एनआयए’कडे
चुकीला माफी नाही! राष्ट्रवादीच्या ‘त्या’ नेत्यांवर अखेर गुन्हा दाखल
आमीर खानच्या मुलीसोबत काम करण्याची संधी; 25 जागा, ‘इतका’ मिळेल पगार!
अनिल देशमुखांच्या घराचं CCTV फुटेज तपासा; परमबीर सिंह सर्वोच्च न्यायालयात
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.