उर्फीनं शाहरूखकडं केलेली ‘ती’ मागणी ऐकून नेटकरी संतापले
मुंबई | अभिनेत्री उर्फी जावेद(Urfi Javed) तिच्या कपड्याच्या फॅशनमुळं नेहमीच चर्चेत असते. नुकताच ‘पठाण'(Pathaan) चित्रपटावरून तिच्यात आणि कंगनाच्यात(Kangana Ranaut) चांगलाच वाद पेटला होता. नुकताच या वादाला पूर्णविराम मिळाला आहे.
त्यातच उर्फीनं आता थेट शाहरूख खानकडं(Shah Rukh Khan) एक मागणी केली आहे. त्यामुळं उर्फीबद्दल सोशल मीडियावर विविध चर्चांणा उधाण आलं आहे. त्यामुळं नेटकरी तिला ट्रोलही करत आहेत.
पठाणच्या दुसऱ्या भागात आपल्याला संधी मिळेल का, अशी विचारणा उर्फीनं शाहरूखकडं केली आहे. सध्या तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.
आता तिचा हा व्हिडीओ पाहून नेटकरी तिला कमेंट्स करत सुनावत आहे. शाहरूखला काय तेवढीच काम आहेत का?, अशा आशयाच्या कमेंट्स नेटकरी करत आहेत.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी उर्फी शाहरूखला आय लव्ह यू म्हणाली होती. तसेच शाहरूख मला तुझी दुसरी बायको बनव,असंही ती म्हणाली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
Comments are closed.